‘या’ जिल्ह्यात पेन्शनची होम डिलिव्हरी, 29000 ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळाले पैसे

‘या’ जिल्ह्यात पेन्शनची होम डिलिव्हरी, 29000 ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळाले पैसे

आतापर्यंत साडे पाच कोटी रुपयांचे निवृत्ती वेतन ज्येष्ठांना घरोघरी जाऊन पोहोचविण्यात आलं आहे.

  • Share this:

धौलपूर, 19 एप्रिल : सध्या देशभरात कोरोनाचा (coronavirus) कहर वाढत आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व बाबी बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा (Covid - 19) सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांना  आहे. मात्र दैंनदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी ज्येष्ठांना त्यांची पेन्शन (Pension) वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत.

राजस्थानातील (Rajasthan) धौलपूर जिल्ह्यातील कलेक्टर यांच्या आदेशानुसार डोअर टू डोअर पेन्शनचं वाटप केलं जात आहे. आतापर्यंत साडे पाच कोटी रुपयांचे निवृत्ती वेतन ज्येष्ठांना घरोघरी जाऊन पोहोचविण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील अनेक भागात सामाजिक सुरक्षा योजनेची पेन्शन घेण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारकडून जारी केलेली मदत घेण्यासाठी बँकांबाहेर रांग लागत होती. त्यातच दौसा जिल्ह्यातही अशाप्रकारची रांग दिसत होती. धौलपूर जिल्हा कलेक्टर राकेश जायसवाल यांनी यावर उत्तर शोधलं आहे. त्यांनी बँकिंग कॉरस्पाँडेंट आणि इंडिया पोस्ट यांच्या माध्यमातून पेंशन डोअर टू डोअर डिलिव्हरी करणे सुरू केले. आतापर्यंत 29000 लोकांना 5.56 कोटी रुपये पेन्शन घरोघरी जाऊन देण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठांना घराबाहेर पडण्याची गरज भासत नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा रोग प्रतिकार शक्ती कमी असणारे आणि रक्तदाब, मधुमेह आदी आजाराची लागण झालेल्यांना असल्याने त्यांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

455 बँकिंग कॉरस्पॉडेंटसह 2500 लोकांची टीम

धौलपूर जिल्हा कलेक्टर यांनी पेन्शन होम डिलिव्हरी करण्यासाठी 455 बँकिंग कॉपस्पाँडेंट सह 2500 लोकांची टीम बनवली आहे. यापूर्वी राजस्थाननेच देशातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मदतीची होम डिलिव्हरी शक्य असल्याचे सांगितले होते.

संबंधित -अडकले 70 यात्रेकरु, प्रशासनाकडे सुटकेची मागणी

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी चर्चेत आहे 'इंदूर मॉडेल' doctor

First published: April 19, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या