मुंबई, 19 एप्रिल : लॉकडाऊनमुळे इतर बॉलिवूड स्टार्सप्रमाणे अभिनेत्री दिशा पाटनी सुद्धा घरीच आहे. मात्र ती नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय आहे. सध्या ती सोशल मीडियावर तिचे टिक टॉक आणि डान्स व्हिडीओ सातत्यानं शेअर करताना दिसते. शूटिंग मधून सुट्टी मिळाल्यानं नेहमीच इतरांपेक्षा काहीतरी हटके करणारी दिशा सध्या आपल्या डान्सनं चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. नुकताच तिनं एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. दिशा पाटनीनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या डान्स स्टेप इतक्या परफेक्ट आहेत की तिच्यावरुन नजरच हटणार नाही. दिशाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 66 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सलमान खाननं कोरोना व्हायरसवर लिहिलं गाणं, सोशल मीडियावर Video Viral
दिशाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाच नाही तर सेलिब्रेटी फ्रेंड्सना सुद्धा खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्यात त्या लॉकडाऊनबद्दल बोलताना दिसल्या होत्या. रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे लातूरऐवजी अडकला या ठिकाणी, Video मुळे झाला खुलासा
दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर शेवटची टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’मध्ये दिसली होती. या सिनेमात तिनं केलेलं ‘डू यू लव्ह मी’ हे आयटम साँग खूपच गाजलं होतं. तिच्या आगामी प्रोजक्टमध्ये सलमान खानचा ‘राधे’ सिनेमा आहे. ज्याचं शूटिंग कोरोना व्हायरसमुळे थांबवण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा करत असून या सिनेमातून सलमान आणि दिशा एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. याआधी सलमानच्या ‘भारत’ सिनेमात तिनं सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?