JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महाराष्ट्राच्या आणखी एका जिल्ह्याने घेतला मोकळा श्वास, कोरोना झाला हद्दपार!

महाराष्ट्राच्या आणखी एका जिल्ह्याने घेतला मोकळा श्वास, कोरोना झाला हद्दपार!

सर्वच्या सर्व रुग्ण बरे झाल्याने दिलासा मिळाला असून जिल्ह्याचा समावेश ग्रीन लिस्टमध्ये झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 20 एप्रिल :  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एकीकडे चिंतेचं वातावरण असताना उस्मानाबाद जिल्हा आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील 3 कोरोनाबाधित रुग्णाचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 3 रुग्ण होते. त्यापैकी सर्वच्या सर्व रुग्ण बरे झाल्याने दिलासा मिळाला असून जिल्ह्याचा समावेश ग्रीन लिस्टमध्ये झाला आहे. गेल्या 19 दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात एकही रुग्णाची भर पडलेली नाही तर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व 85 नागरिकांची कोरोना चाचणीसुद्धा निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. परंतु, खबरदारी म्हणून जिल्ह्यात लॉकडाउनचे पूर्ण पालन केले जात आहे. **हेही वाचा -** ब्रेकिंग न्यूज, पुणे शहर 8 दिवसांसाठी पूर्णपणे सील दरम्यान, उस्मानाबादला लागूनच असलेल्या लातूर जिल्ह्यानेही कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र, हरियाणा येथून निलंगा येथे आलेले मूळ आंध्रप्रदेश येथील आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यांचा प्रथम अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्या सर्व आठही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आले असून लातूरकरांना दिलासा मिळाला आहे. शिवाय लातूर जिल्हा देखील कोरोनामुक्त झाल्यामुळे आता लातूरदेखील ग्रीन झोनमध्ये येण्यास सज्ज झालं आहे. मात्र, असं असलं तरी पुढच्या काही दिवसात पुन्हा कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव करून नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या चाचण्या करण्यात महाराष्ट्र आघाडीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या (corona testing) वाढवल्या असून आता कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्यच सर्वात आघाडीवर आहे. आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) जाहीर केलेल्या आकडेवारतून हा खुलासा झाला आहे. हेही वाचा -  रेड, ऑरेंज आणि ग्रीन…सरकार ‘या’ निकषांच्या आधारे ठरवतं कोरोनाचे झोन राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक दिसत आहे. महाराष्ट्राने टेस्टिंगमध्ये साठ हजारांचा टप्पा गाठला आहे. त्या तुलनेत इतर राज्ये कुठेच नाहीत. चाचण्या घेण्यात आपल्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पाचवा क्रमांक उत्तर प्रदेशचा लागतो. रँपिड टेस्टिंगचं घोषणा करणारं केजरीवालांचं दिल्ली तर थेट सातव्या क्रमांकावर आहे. तर सहावा क्रमांक केरळचा लागतो. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या