Home /News /maharashtra /

रेड, ऑरेंज आणि ग्रीन...सरकार 'या' निकषांच्या आधारे ठरवतं कोरोनाचे झोन

रेड, ऑरेंज आणि ग्रीन...सरकार 'या' निकषांच्या आधारे ठरवतं कोरोनाचे झोन

Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)

Mumbai: People at a market to buy essential items during day-2 of a nationwide lockdown, imposed in the wake of coronavirus pandemic, at Dongri Market, in Mumbai, Thursday, March 26, 2020. (PTI Photo)(PTI26-03-2020_000265B)

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दृष्टीकोनातून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन चर्चेत आहे.

    मुंबई 20 एप्रिल : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दृष्टीकोनातून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन चर्चेत आहे. पण हे झोन नक्की ठरवले कसे जातात याबद्दल थोडक्यात माहिती अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिली. रेड झोन म्हणजे ज्यात सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत असा झोन . यात आऊटब्रेक आणि क्लस्टर असे दोन भाग पडतात. आउटब्रेकमध्ये 15 पेक्षा जास्त रुग्ण असतात तर क्लस्टरमध्ये 15 पेक्षा कमी रुग्ण असतात. ऑरेंज झोन म्हणजे ज्यात गेल्या 14 दिवसांत रुग्ण आढळलेला नाही असा भाग आणि ग्रीन झोन म्हणजे असा ऑरेंज झोन ज्यात त्याच्या पुढील 14 दिवस एकही रुग्ण आढळत नाही. तीन झोननुसार जिल्ह्यांची विभागणी राज्यात रेड झोनमध्ये 8 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेल्या जवळपास 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया हे जिल्हे आहेत. आतापर्यंत कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 9 असे जिल्हे आहेत जिथं अजून कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. यामध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. कुठे आणि कशी मिळणार सूट? '20 तारखेपासून काही प्रमाणात परवानगी मिळेल. काही जिल्हे कोरोनामुक्त आहेत. काही ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. आपण झोन केलेले आहेत...रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन केले आहेत.ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार,' अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणार असाल तर आम्ही धान्य पुरवू. आता मला कोणताच धोका पत्कारायचा नाही. काहीही न करता शांत राहाणं ही मोठी शिक्षा...पण आपण ते करतोय. पण हळूहळू शिथिलता आणणार मुभा देत आहोत...शेती, जीवनावश्यक गोष्टी याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडणार नाही. जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच वाहतुकीला परवानगी. 3 मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं आहे,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या