Home /News /news /

ब्रेकिंग न्यूज, पुणे शहर 8 दिवसांसाठी पूर्णपणे सील

ब्रेकिंग न्यूज, पुणे शहर 8 दिवसांसाठी पूर्णपणे सील

पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे.

    पुणे, 20 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता पुणे पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये मास्क घातलं नाही म्हणून पित्यानं दिव्यांग मुलाला संपवलं आजपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही उद्योग सुरू होत आहे. मात्र, त्याच वेळी पुढचे 8 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. पुणे आणि पिंपरीतून बाहेर कुणी जाऊ नये आणि जिल्ह्यातून कुणी येऊ नये यासाठी हद्दी,सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील बराच भाग आधीच सील करण्यात आला आहे. सील केलेल्या भागात 10 ते 12 दोन तास तर उर्वरित भागात 10 ते 2 या वेळात जीवनावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सुरू राहणार आहेत. औषधाची दुकाने,रुग्णालय पूर्ण वेळ उघडी राहणार आहेत. हेही वाचा - भयंकर! घरी परतण्यासाठी घेतला अंधश्रद्धेचा आधार, देवीसमोर कापली स्वत:चीच जीभ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 669 वर दरम्यान, पुण्यात रविवारी दिवसभरात 42 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती.  डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 181 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  कोरोनाचा संसर्ग झालेले 18 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 15 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 ससूनमध्ये तर इतर चौघांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 669 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. काही भागात 24 एप्रिलपर्यंत दुकानं बंद, होम डिलिव्हरी सुरू पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाल्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजू लोकांना घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या