JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंब्य्रात मांजरीमुळे शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक

मुंब्य्रात मांजरीमुळे शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक

एकमेकांशी भिडलेल्या शेजाऱ्यांची हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन हल्ला केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 16 मे : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. डॉक्टर आणि पोलीस जीवाची बाजी लावून कर्तृव्य बजावत आहे. परंतु, पोलिसांवर हल्ले होण्याचे थांबत नाही. मुंब्य्रात  क्षुल्लक वादातून तुफान हाणामारी झाली. धक्कादायक म्हणजे, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक केली. एकमेकांशी भिडलेल्या शेजाऱ्यांची हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन हल्ला केल्याची घटना  बुधवारी संध्याकाळी घडली.  हल्यात काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा -  राज्यात घरपोच मद्यविक्रीला सुरुवात, पहिल्याच दिवशी मिळाला तुफान प्रतिसाद घडलेली हकीकत अशी की, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फेमस कॉलनी भागातील साई किरण सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर नासीर पटेल कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या पटेल कुटुंबाच्या घरी असलेल्या मांजरीचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. ‘मांजरीला घरात ठेवा’ अशी तक्रार सोसायटीमध्ये राहत असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाकडे केली होती. त्यावरून पटेल आणि खान कुटुंबात वाद उफाळला. उद्भवलेल्या वादावादीत नासीर पटेल तसंच त्याची मुले फहाद,फरहान,परेश, फराज व जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली.  या प्रकरणी परेश पटेल याने मोबाईल हिसकावला तर, फहादने विनयभंग केल्याची तक्रार यास्मीन खान हिने पोलिसांत दाखल केली आहे. दरम्यान,दोन्ही कुटुंबातील भांडण सोडवण्यासाठी सहा.पोलीस निरिक्षक बोरसे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. तेव्हा,पोलीस शिपाई मयुर लोखंडे तसंच अन्य पोलिसांच्या दिशेने जमावाने तुफान दगडफेक केली. यात लोखंडे याच्या पायाला मार लागला असून, पोलीस शिपाई परब याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. हेही वाचा - घातपाताचा मोठा कट उधळला, 4 आयडी स्फोटकांसह 3 पेट्रोल बॉम्ब जप्त   या घटनेचं चित्रण करत असलेल्या इस्माईल खान याचा कॅमेरा अनोळखी व्यक्तीने लांबवला. याप्रकरणी, लोखंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शादाब खान, हैदर खान, शोहेब खान, रमजान इदरिसी, हसिब शेख, नदीम कुरेशी, इब्राहिम खान, यासीन कुरेशी, अब्दूल छत्रीवाला, मो.तारीख जाफरानी, सुफीयान खान, काशिफ, सुफियान खान,आरीफ पतंगवाला याच्यांसह 40 ते 50 अनोळखी व्यक्तीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात करीत आहेत. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या