मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING: घातपाताचा मोठा कट उधळला, 4 आयडी स्फोटकांसह 3 पेट्रोल बॉम्ब जप्त

BREAKING: घातपाताचा मोठा कट उधळला, 4 आयडी स्फोटकांसह 3 पेट्रोल बॉम्ब जप्त

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला आहे.

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला आहे.

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला आहे.

गडचिरोली, 16 मे: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट सुरक्षा जवानांनी उधळला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करण्यासाठी माओवाद्यांनी शक्तीशाली स्फोटकं रस्त्यावर पेरुन ठेवली होती. चार आयडी स्फोटकांसह तीन पेट्रोल बॉम्ब जप्त करण्यात आली आहे. आयडीची स्फोटके दोन कुकरमध्ये भरुन त्याला रिमोट जोडण्यात आला होता. तर पेट्रोल बॉम्बही पेरुन ठेवण्यात आले होते. जवानांनी दंतेवाडा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करून ही स्फोटके शोधून काढली. सर्व स्फोटके निकामी करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा.. सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला 'हा' इशारा बारसूर लगत रस्त्याच्या बांधकामाला सुरक्षा देण्यासाठी 300  जवान निघाले होते. तत्पूर्वीच शोधमोहीमेत ही स्फोटके सापडली आहेत. आयडीची स्फोटके प्रत्येकी पाच किलोची होती आणि एंटेनाचा वापर करुन रिमोटने स्फोट घडवण्याचा अत्याधुनिक तंत्राचा माओवादी पहिल्यांदा वापर करणार होते. मोठ्या हल्ल्यांची माओवाद्यांची योजना होती. जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांची उधळली गेली आणि जवानांचे प्राण थोडक्यात बचावले. माओवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग पोलिसांनी केले निकामी.. गेल्या मार्च महिन्यातही माओवाद्यांचा मोठा घातपात घडवून आणण्याचा इरादा होता. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला होता. माओवाद्यांनी पेरुन ठेवलेला भूसुरुंग पोलिसांनी निकामी करत त्यांचा कट उधळून लावला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी दुर्घटना टळली होती. पोलिस मदत केंद्र हेडरी हद्दीत बोडमेटाच्या जंगल परिसरात पोलिस आणि सीआरपीएफ बटालियन 191 कंपनीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. दरम्यान, माओवाद्यांनी रस्त्यात भूसुरुंग पेरुन स्फोट घडवून आणत जवानांच्या दिशेने गोळीबार केला होता. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. माओवाद्यांचा कट उधळून पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. हेही वाचा..   अत्यावश्यक सेवेचं नाव, गाडीत होता 1 कोटींचा गुटखा, सापळ्यात असा अडकला दरम्यान, त्याआधी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रचलेला घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला होता. नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने लावलेले 15 किलोग्रॅम वजनाचे क्लेमोर माईन निकामी करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं होतं. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
First published:

Tags: Chattisgarh, Gadchiroli

पुढील बातम्या