JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मनसे नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर केली टीका, पाहा हा VIDEO

मनसे नेत्याने घेतली कंगनाची बाजू, शिवसेनेवर केली टीका, पाहा हा VIDEO

एका व्यक्तीच्या वक्तव्याला 5 पैशांची किंमत नाही. अशा व्यक्तीला महत्त्व देण्याची गरज आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्यामुळे वादंग उठला आहे. शिवसेनेसह मनसेनंही कंगना राणावतच्या या भूमिकेला विरोध केला आहे. पण, दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कंगनाची बाजू घेतल्याचे समोर आले आहे. ‘राज्यातील मंदिर बंद आहे. मंदिरं सुरू करावी अशी मागणी होत आहे. लॉकडाउनच्या काळात लाखो लोकं बेरोजगार झाले आहे.  आरोग्य व्यवस्था चांगली नसल्यामुळे हजारो लोकांचा बळी जात आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच बसून काम करत आहे. रेल्वे सेवा बंद आहे त्यामुळे हजारो लोकांचे हाल होत आहे’ अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केली केली. दुसरीकडे एका व्यक्तीच्या वक्तव्याला 5 पैशांची किंमत नाही. अशा व्यक्तीला महत्त्व देण्याची गरज आहे का? प्रसिद्धी मिळवण्यासाठी कंगनाने बेताल वक्तव्य केले आहे, त्याला इतके महत्त्व देण्याची गरज आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थितीत केला.

संबंधित बातम्या

कंगनाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी फास फेकला आहे. यात शिवसेना स्वत: ला का अडकवून घेत आहे. शिवसेनेनं या जाळ्यात फसावे इतकी  र्निबुद्ध झाली आहे का? मुख्य विषयापासून लक्ष्य दूर करण्यासाठी शिवसेनेकडून विरोध सुरू आहे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान,  कंगणाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत (Anil Deshmukh) सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे. पुण्यात कोरोनाबाबत कुठं चुकतेय रणनीती? शरद पवारांनी लावला बैठकांचा सपाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही कंगनाविरोधात अनेक ठिकाणी निषेध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी POK शी मुंबईची तुलना करणार्‍या कंगनाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशीवर कंगनाने मुंबईची तुलना  पाकिस्तानशी केली. यावर आता शिवसेनेकडून काही पोस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ‘ये डर होना चाहिए मुंबई व महाराष्ट्राचा नाद कोणी करू नये!’, ‘मुंबई POK वाटते तर… कंGOना’ अशा शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या