अवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.
मुंबई, 13 सप्टेंबर : चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राजभवन इथे ही भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगना विरूद्ध शिवसेना सामना रंगला असतानाच कंगना राज्यपाल यांची भेट घेत असल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांत गेली काही दिवस वाकयु्द्ध रंगले आहे. त्यात केंद्र सरकारने वाय दर्जा सुरक्षा दिली. त्यानंतर मुंबई महापालिकेन कंगना ऑफिसवर कारवाई केलीं. कारवाईनंतर कंगनाकडून शिवेसना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकेरी वक्तव्य केली. त्यावर सेनेकडून टीका झाली. या सगळ्यात, राज्यपाल यांनी केंद्र सरकारकडे कंगना प्रकरणात रिपोर्ट पाठवल्याच्या बातम्या समोर आल्या. पण त्यावर स्वत: राज्यपाल यांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट कंगनाने राज्यपाल यांची भेटीची वेळ मागितली आहे. या आधी राज्यपाल यांनी अनेक मुद्दावर राज्य सरकारला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्याने पुन्हा एकदा ठिणगी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुदाम मुंडे हॉस्पिटलमधून 2 महिलांचं गर्भ गायब, कारवाईत धक्कादायक सत्य समोर उद्धव ठाकरेंना रावणाच्या भूमिकेत दाखवणारं कंगनाचं वादग्रस्त TWEET आपलं ऑफिस तोडण्यासाठी आलेल्या BMC ला अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana ranaut) बाबराचं सैन्य म्हटलं होतं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) तिनं थेट रावण (ravana) म्हटलं आहे. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात नवं ट्वीट करत पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात नवं वादग्रस्त ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं उद्धव ठाकरेंना रावणाच्या भूमिकेत दाखवलं आहे. BMC ने ऑफिस पाडल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागोमाग अशा संतप्त ट्वीटचा भडीमार केला. आता तिनं नवं ट्वीट मराठी भाषेतच केलं आहे. तिनं आपला मराठी ठसका दाखवला आहे. कंगनाने या ट्वीटसह एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाई आहे आणि उद्धव ठाकरेंना रावण बनवलं आहे. ज्यांच्यामागे बुल्डोझर दाखवला आहे आणि रावणदहन होताना दाखवलं आहे. तर शिवाजी महाराज हे राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत असलेल्या कंगनाच्या हातात तलवार देत आहेत. …तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना हा फोटो विवेक अग्निहोत्रीचं असल्याचं कंगनानं सांगितलं आहे. हा फोटो पाहून मी खूप भावनिक झाले, मला गहिवरून आलं असंही कंगना म्हणाली. फोटोसह कंगनाने मराठीत ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली, “लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहिन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहिन. जय हिंद, जय महाराष्ट्र”