सुदाम मुंडे हॉस्पिटलमधून 2 महिलांचं गर्भ गायब, कारवाईत धक्कादायक सत्य समोर

सुदाम मुंडे हॉस्पिटलमधून 2 महिलांचं गर्भ गायब, कारवाईत धक्कादायक सत्य समोर

सुदाम मुंडेने हॉस्पिटलमध्ये तपासलेल्या तीन महिलांपैकी दोघींचे गर्भ गायब असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

बीड, 13 सप्टेंबर : स्त्रीभ्रूणहत्याचा काळा डाग बीडच्या माथी मारणाऱ्या क्रूरकर्मा डॉ सुदाम मुंडेचा आणखी एक काळा प्रताप समोर आला आहे. परळी शहराजवळ बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू करून गर्भपात आणि कोरोना प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारीवरून सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलवर बीड जिल्हा प्रशासन मोठी कारवाई केली होती. या कठोर कारवाईनंतर आता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम मुंडेने हॉस्पिटलमध्ये तपासलेल्या तीन महिलांपैकी दोघींचे गर्भ गायब असल्याचं समोर आलं आहे.

या महिलांचं माहेर आहे पण त्या मुळच्या पुणे, हैदराबाद इथल्या रहिवाशी आहेत. त्यांची चौकशी आरोग्य विभागाने केली असता हे खळबळजनक सत्य उघडकीस आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर बाब म्हणजे दोन्ही महिलांची गर्भपाताची कारण वेगवेगळी सांगितली आहेत. या विषयी आरोग्य विभागाला संशय आला असल्याची माहिती असून पुढील तपास सुरू असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितलं.

आता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या

दरम्यान, पोलिसांनी याआधी रुग्णालयावर कारवाई केली होती. त्यावेळ अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा करत मुजोरी केल्याचं समोर आलं. यामुळं संताप व्यक्त केला जात आहे. देशभरात गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या डॉ. सुदाम मुंडे याने बेकायदेशीरपणे हॉस्पिटल सुरु करत स्वतः प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कडे मिळाल्यानंतर सापळा रचून आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री मुंडेच्या बेकायदेशीर हॉस्पिटलवर छापा मारला होता.

...तर पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू होणार का? अजित पवारांची महत्त्वाची सूचना

यावेळी गर्भपात आणि कोरोना संशयास्पद साहित्य आणि औषधी सापडली. तसेच या दवाखान्यात कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार सुरु होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली होती. सुदाम मुंडे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द केलेले असून हे रुग्णालय बेकायदेशीर सुरू होतं. याला कुठलीही परवानगी नव्हती असेही जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 13, 2020, 7:42 AM IST

ताज्या बातम्या