ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
फ्रान्स, 29 मे : सध्या देशभरात कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. अशातच समोर आलेल्या अभ्यासानुसार कोरोनामुळे आजारी असणाऱ्या 10 रुग्णांपैकी 1 रुग्ण ज्याला मधूमेह देखील आहे, त्याचा हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर 7 दिवसांच्या आत मृत्यू होऊ शकतो. तर, पाच रुग्णांपैकी एकाला व्हेंटिलेटवर ठेवण्याची आवश्यकता असू शकते, असेही या अभ्यासात म्हंटलं आहे. 10 ते 31 मार्च दरम्यान फ्रान्समधील 53 हॉस्पिटल्समध्ये संशोधन करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 1,317 COVID-19 पेशंट्सचा डेटा यावेळी अभ्यासण्यात आला. या संशोधनामध्ये फ्रान्समधील University of Nantes मधील संशोधकांचा समावेश होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांमध्ये टाइप-2 मधुमेह आहे, तर 3 टक्के रुग्णांना टाइप-1 मधुमहे. तर उर्वरित रुग्णांमध्ये इतर काही प्रकारचा मधुमेह आहे. (हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा ) Diabetologia या जरनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या रिसर्चनुसार, अभ्यास करण्यात आलेल्या रुग्णालयातील दोन तृतीयांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पुरूष आहेत, आणि त्यांचे सरासरी वय 70 वर्षे इतकं आहे. यामध्ये संशोधकांनी असं नमूद केले आहे की, रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य नसल्यास त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र या परिस्थितीत मधुमेह आणि जास्त वय असणाऱ्यांंमध्ये मृत्यूचा धोका वाढला आहे. 47 टक्के रुग्णांमध्ये डोळे, मूत्रपिंड आणि मज्जातंतू यामध्ये काहीशी क्लिष्टता आढळून आली. तर 41 टक्के रुग्णांच्या हृदय, मेंदू आणि पायमधील रक्तवाहिन्यांसंबधी microvascular समस्या आढळून आली. (हे वाचा- चीनमुळे वाढणार जगाची डोकेदुखी, कोरोना पसरवणारा ‘तो’ बाजार पुन्हा झाला सुरू ) संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अभ्यास केलेल्या रुग्णांमध्ये 5 रुग्णांपैकी एकाला सातव्या दिवशी अतिदक्षता घेण्यासाठी व्हेंटिलेटवर ठेवण्याची आवश्यकता भासली. त्यांनी असे देखील सांगितले आहे की, आतापर्यंत 10 पैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी 18 टक्के रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संशोधकांच्या मते मायक्रोव्हॅस्क्यूलर कॉम्प्लिकेशन्समुळे सातव्या दिवसापर्यंत मृत्यू होण्याची जोखीम दुप्पट झाली आहे. (हे वाचा- जगातली सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट तयार, 1 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान ) त्याचप्रमाणे या संशोधनानुसार 55 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या गटापेक्षा 75 पेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता 14 पट जास्त आहे.