वुहान, 29 मे : चीनच्या वुहानमधून डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. याचं कारण ठरला चीनमध्ये जिवंत प्राण्यांचा बाजार. त्यानंतर चीनवर जगभरातून टीका करण्यात आली. मात्र चीननं आता पुन्हा जिवंत प्राण्यांचा बाजार सुरू केला आहे. या बाजारपेठेत जिवंत जनावरांची विक्री करणाऱ्या लोकांनी आपली दुकाने परत सुरू केली आहेत. या बाजारापासून थोड्याच अंतरावर ते ठिकाण आहे जेथून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जात. याचं नाव ह्युवानान सीफूड होलसेल मार्केट असं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ह्युवानान सीफूड बाजारातून प्रथम झाला. यानंतर 1 जानेवारी रोजी हा बाजार बंद करण्यात आला. या बाजारात सर्व प्राण्यांचे मांस मिळते जे लोकं खाऊ शकतात. वुहानच्या जनावरांच्या बाजारात मांस आणि जवळपास 112 प्रकारच्या जिवंत प्राण्यांचे अवयव विकले जातात. याशिवाय मृत प्राणी स्वतंत्रपणे विकले जातात. वाचा- परदेशातून परतली गर्भवती, हॉस्पिटलमध्ये प्रवेश न दिल्यामुळे गर्भातच दगावलं बाळ चीन सरकारनं हा बाजार दुसर्या ठिकाणी हलविला आहे. आता ह्युवानान सीफूड मार्केट उत्तर हॅन्को सीफूड मार्केट जवळ सुरू करण्याता आला आहे. नवीन ठिकाणी बाजारपेठ उभारणाऱ्या दुकानदारांनी सांगितले की काही दिवसांनी बाजार पुन्हा आपल्या जुन्या जागेवर आणता येईल अशी आशा व्यक्त केली. या बाजारात दुकान असलेल्या एका महिलेनं डेली मेलला सांगितले की, कोरोनामुळे बाजार बंद करण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. आता नवीन ठिकाणाहून काम करावे लागत आहे. वाचा- लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या घरात हलला होता पाळणा, पण कोरोनानं… या बाजारात कोणच्या प्राण्याचं मांस मिळत नाही असं नाही. याच बाजारातून वटवाघूळाचं मांस खाऊन वुहानमध्ये कोरोना पसरला. या बाजारात एवढी गर्दी असते की येथून चालणे अवघड आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून हा बाजार बंद होता. हे सर्व प्राणी वुहानच्या पशु बाजारात एकत्र विकले जातात. तेथेच त्यांना कापले जाते. त्यामुळं अस्वच्छता आणि किटकांमध्ये कोरोनाही पसरला. या बाजारात होणाऱ्या कचर्यामुळे बर्याच रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. अखेर, हेच घडलं. अस्वच्छतेमुळं हा विषाणू एका सापात गेला आणि साप खाण्यामुळे चीनमध्ये कोरोना पसरला असं म्हटलं जात आहे. वाचा- कोरोनानं हिसकावलं एका आईचं सुख, 7 वर्षांनंतर दिला बाळाला जन्म पण…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.