हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा, या कोरोना योद्ध्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

हॉस्पिटलमध्येच पार पडला नर्स-डॉक्टर कपलचा विवाहसोहळा, या कोरोना योद्ध्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. अन्नालान नवरत्नम (Annalan Navaratnam) आणि नर्स असणाऱ्या जॅन टिपिंग (Jann Tipping) ज्या लंडनमधील हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या हॉस्पिटलच्या चर्चमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

  • Share this:

लंडन, 29 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जग अवघ्या काही महिन्यात वेगळ्याच स्वरूपात दिसू लागले आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन व्यवहार असे अनेक बदल जगाने स्विकारले आहेत. जगाला कोरोनापासून वाचवण्यासाठी अनेक मेडिकल कर्मचारी फ्रंटलाइनवर काम करत आहेत. त्यांच्या अनेक कहाण्या दिवसेंदिवस समोर येत आहे. दरम्यान अशीच एक कहाणी आहे डॉ. अन्नालान नवरत्नम (Annalan Navaratnam) आणि नर्स असणाऱ्या जॅन टिपिंग (Jann Tipping) यांची. ज्या हॉस्पिटलमध्ये ते फ्रंटलाइनवर कोरोना योद्धा म्हणून काम करत होते, त्याच हॉस्पिटलमध्ये दोघांनी विवाह केला. लंडनच्या St Thomas' हॉस्पिटलच्या चर्चमध्ये हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.  BBC च्या वृत्तानुसार हा सोहळा त्यांच्या आप्तजनांना आणि इतर लोकांना पाहता यावा याकरता लाइव्ह करण्यात आला होता.

(हे वाचा-जगातली सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट तयार, 1 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान)

दक्षिण लंडनमधील या जोडप्याचं लग्न ठरल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात होणार होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यांचे कुटुंबीय त्याठिकाणी पोहचू शकत नव्हते. वधूचे कुटुंबीय उत्तर आयर्लंड तर मुलाचे कुटुंबीय श्रीलंकेतून येणार होते. मात्र सर्वत्र लॉकडाऊन असल्या कारणामुळे ते शक्य नाही, परिणामी दोघांनी आधीच विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. 'सर्वांचे स्वास्थ व्यवस्थित असताना' या दोघांनी छोटेखानी विवाह करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात हॉस्पिटलकडून एक निवेदन देखील जारी करण्यात आले आहे. हॉस्पिटलने या लग्नातील काही क्षण त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर जॅन आणि नवरत्नम यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. दोघांचे व्हायरल झालेले फोटो देखील अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सचिव असणाऱ्या मॅट हँकॉक यांनी देखील 'this is lovely' असं म्हणत या गोड लग्नाचं कौतुक केलं आहे.

कोरोनाशी सामना करणाऱ्या या योद्धांना हॉस्पिटलमध्येच लग्न करण्यासाठी परवानगी दिल्याने सोशल मीडियावर हॉस्पिटल प्रशासनाचे देखील कौतुक होत आहे.

First published: May 29, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या