मुंबई, 28 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्यात मुंबईत सर्वात जास्त रुग्ण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. आता सरकारकडून आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत 100 बेड्स व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेले कोविड क्रिटी केअर सेंटर उभारण्याचे काम सुरू केले आहे. या सेंटरमध्ये सध्या 22 बेड्स तयार आहेत. हेही वाचा - माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही; बारामतीत घडली घटना हे कोविड सेंटर विशेष करून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठीच असणार आहे. या सेंटरमध्ये अशाच रुग्णांना ठेवलं जाणार ज्यांना कोविड झाला आणि खूप गंभीर आजारी आहे. विशेष म्हणजे, कोरोनाबाधित असलेल्या गरोदर स्त्रियांची प्रसूती पण येथे केली जाईल. इतकेच नाहीतर एखाद्या रुग्णावर सर्जरीची गरज आहे, अशा रुग्णांवर सर्जरीही या सेंटरमध्ये केली जाणार आहे. या कोविड क्रिटी केअर सेंटरचे काम दिवस-रात्र सुरू आहे. लवकरच आणखी 78 बेडची सुविधा केली जाणार आहे. हेही वाचा - चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा लहान मुलांसाठी विशेष वार्ड तसंच, जन्मजात अर्भकापासून ते अगदी बारा वर्षांच्या मुलापर्यंत कुणालाही कोरोनाची लागण झाली असेल अशांसाठी 20 बेडचं एक स्पेशल पीडियाट्रिक म्हणजेच लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. जिथे 9 व्हेंटिलेटर लावण्यात आलेले आहेत. 9 पैकी तीन हे एक महिन्यापर्यंतच्या मुलांसाठी तर सहा व्हेंटिलेटर 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही व्यवस्था असणार आहे. ज्या मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि अत्यंत गंभीर आहेत अशाच मूलांना इथं दाखल केला जाणार आहे. संपादन - सचिन साळवे