चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा

चाचण्या यशस्वी झाल्या तर 3 आठवड्यांत मिळणार कोरोनावर लस, पुणे SII दावा

सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येईल अशी अपेक्षा आहे. या चाचण्या सर्व पद्धतीने यशस्वी झाल्या तरच त्या पुढे वापरण्यात येईल असंही यामध्ये म्हटलं आहे.

  • Share this:

पुणे, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अशात यावर योग्य ती लस शोधण्यासाठी आता संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर कोव्हिड-19 लस पुढच्या तीन आठवड्यांत सुरू होईल असा विश्वास पुण्यात स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आदर्श पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी एसआयआयच्या एका प्रेस रिलीजमध्ये पुढचाय रोड प्लॅन स्पष्ट करण्यात आला. त्यामध्ये कोरोनाच्या लसीवरील माहिती देण्यात आली आहे. एसआयआयची टीम यूकेच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर हिलसोबत चर्चा करून एकत्र यावर काम करत आहे.

संस्थेच्या प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येईल अशी अपेक्षा आहे. या चाचण्या सर्व पद्धतीने यशस्वी झाल्या तरच त्या पुढे वापरण्यात येईल असंही यामध्ये म्हटलं आहे. खरंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये आहे. ही जगातील सर्वात मोठी लस आणि त्याचे डोस उत्पादक कंपनी आहे. ही 53 वर्षीय जुनी कंपनी दर वर्षी 1.5 अब्ज डोसची निर्मिती करते. या कंपनीत सुमारे 7,000 लोक काम करतात. कंपनी 165 देशांमध्ये 20 लस पुरवते. आता या फर्मनं अमेरिकन बायोटेक कंपनी कोडगेनिक्सशी करार केला आहे.

घरी जा म्हणणाऱ्या पोलिसावर उगारलं दांडकं, पिंपरीमधला धक्कादायक प्रकाराचा VIDEO

भारतात लस चाचण्या मे महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा

एसआयआयची लस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत यूकेमध्ये तयार केली जाईल आणि यामध्ये क्लिनिकल चाचण्या यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. दोन-तीन आठवड्यांत ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार नाही. एसआयआयची आशा आहे की, मेमध्ये भारतात स्वतःच्या लसीची चाचणी सुरू होईल. तसेच, ही लस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, परंतु चाचणी यशस्वी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

पुण्यातील एसआयआयचे उत्पादन आणि उत्पादन सुविधा कोव्हिड - 19 लस तयार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, संस्था कोव्हिड - 19 लससाठी एक नवीन सुविधा तयार करत आहे. हे पूर्ण होण्यासाठी सुमारे 2-3 वर्षे लागतील. पण सध्या असलेलल्या एका युनिटमध्ये एक लसीचे उत्पादन सुमारे 3 आठवड्यात सुरू होईल.

पहिल्या सहा महिन्यांकरिता दरमहा 40 ते 50 लाख डोस तयार करण्याचं एसआयआयचं उद्दीष्ट आहे. यानंतर, दरमहा एक कोटी डोसमध्ये वाढ केली जाऊ शकते. एसआयआय सप्टेंबरपर्यंत 2 ते 4 कोटी डोसची अपेक्षा आहे.

कोरोना रुग्णांची संख्या 28 हजाराच्या वर, वाचा काय आहे तुमच्या राज्याची स्थिती

First published: April 28, 2020, 8:47 AM IST

ताज्या बातम्या