जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन 'तो' थांबला नाही; बारामतीत घडली घटना

माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन 'तो' थांबला नाही; बारामतीत घडली घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस वर्दीतील जखमी पवार यांना बारामतीच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

बारामती, 28 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाला संपवण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून लढा देत आहे. परंतु, बारामतीमध्ये कर्तृव्य बजावून घरी परतत असणाऱ्या एका पोलिसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी पोलीस कर्मचारी एम.डी पवार हे बंदोबस्तावर होते.  सायंकाळी साडेसात वाजता शहरातील बंदोबस्त आटोपून आपल्या मोटारसायकल वरून घरी जात असताना, जळोची-लाकडी रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कारने पवार यांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात एम.डी पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेही वाचा -  अंत्यसंस्कार केल्यानंतर सापडली महिला, रुग्णालयातूनच केला घरी फोन आणि… रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस वर्दीतील जखमी पवार यांना बारामतीच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकला हलवण्यात आले आहे. पवार यांचा अपघात झाल्याची माहिती कळताच शहराचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहा.पोलीस निरीक्षक पद्मराज गंफले आणि सहकारी यांनी पवार यांच्यावर त्वरीत उपचारासाठी प्रयत्न केले. **हेही वाचा -** घरी जा म्हणणाऱ्या पोलिसावर उगारलं दांडकं, पिंपरीमधला धक्कादायक प्रकाराचा VIDEO लाकडी-जळोची रस्त्यावर ज्या अज्ञात वाहनचालकाने धडक देऊन पसार झाला. त्याचा शोध सुरू असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर घराबाहेर निघू नका, असं वारंवार आवाहन करून देखील लोकं  बाहेर पडत आहेत. आता पोलीस प्रशासन प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करून त्याच्याकडे वाहन परवाना आहे का?कुठल्या कारणांमुळे बाहेर पडला?याचे उत्तर नसेल तर त्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: police
  • First Published :
जाहिरात
जाहिरात