JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / असाही एक योद्धा.. स्वत: डायलिसिसवर असून कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये बजावतोय कर्तव्य

असाही एक योद्धा.. स्वत: डायलिसिसवर असून कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये बजावतोय कर्तव्य

कोरोनाविरुद्धच्या युद्धात आरोग्य विभागासोबतच पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मालेगाव, 28 एप्रिल: किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. तसेच स्वत: डायलेसिसवर असताना इतरांना कोरोना होऊ नये यासाठी एक पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात राजेंद्र सोनवणे हा जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल कर्तव्य बजावत असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अदृश्य शत्रू असलेल्या कोरोना युद्धात अनेक जण उतरले आहेत. या सर्वांचं एकच ध्येय आहे ते कोरोना विषाणूला देशातून हद्दपार करणे. या युद्धात आरोग्य विभागासोबतच पोलिसही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे. हेही वाचा.. पुणेकरांसाठी खूशखबर! आला नवा आदेश, लॉकडाऊनमध्ये मिळणार ही सूट पोलिस दलातील राजेंद्र सोनवणे नावाचा एक योद्धा असून त्याला किडनीचा आजार असल्याने आठवड्यातून दोन वेळा त्याला डायलिसिस घ्यावे लागते. मात्र असे असतानाही हा कोरोना वारियर्स मालेगावात रोज आपले कर्तव्य बजावत आहे. राजेंद्र सोनवणे हे जमादार पदावर 33 वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहे. ते मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये ऑन ड्युटी आहे. त्यांना किडनीचा आजार असून एक किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. तर दुसरीही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. ते गेल्या चार वर्षांपासून डायलिसीसवर आहेत. आठवड्यातून दोन वेळा यासाठी त्याला दवाखान्यात जावे लागते. देशात कोरोनानं थैमान घातलं असून मालेगाव हॉटस्पॉट आहे. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण आला आहे. हेही वाचा… GOOD NEWS: कोरोनाचा हॉटस्पॉट मालेगावात 440 पैकी 439 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आधीच पोलिसांची संख्या कमी त्यात कोरोनामुळे कामाचा वाढलेला ताण पाहून राजेंद्र सोनवणे यांच्यातील पोलिस जागा झाला. स्वत: मृत्यूशी झुंज देत असताना हा पठ्ठा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी मैदानात उतरला आहे. सध्या कॅम्प परिसरात रावळगाव नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या