मालेगाव, 27 एप्रिल: कोरोना व्हायरसमुळे हादरलेल्या नाशिककरांसाठी आजचा सोमवार गुड न्यूज घेऊन आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात 440 पैकी 439 संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. आनंदाची बाब म्हणजे आधीच्या 4 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांना सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्या 3 रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला होता.
हेही वाचा..देश पुन्हा मोठ्या संकटात सापडणार! भेंडवळ घटमांडणीत वर्तवलं धक्कादायक भाकीत
हॉटस्पॉट झालेल्या मालेगावात 7 रुग्णांनी कोरोनाला धोबीपछाड दिल्याने 7 रुग्ण कोरोनामुक्त तर 439 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे नागरिक व प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख आरती सिंग यांच्यासह हॉस्पिटलमधील डॉक्टर, मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत बऱ्या झालेल्या रुग्णाना मंसुरा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सर्वांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर फुलांचा वर्षाव केला.
हेही वाचा...कॅन्सरचं काय कोरोनासमोरही मानली नाही हार; 4 वर्षांच्या चिमुरडीचा लढा यशस्वी
रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी जात आहे. त्यामुळे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे लक्षण असतील त्यांनी तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन दादा भुसे यांनी केले..
उपचारादरम्यान आणखी अनेक रुग्ण निगेटीव्ह झाले असून आगामी काळात मालेगाव कोरोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. पोलिस हे जवानांसारखे लढत आहे जवानांसमोर शत्रू असतो. मात्र पोलिस हे कोरोनासारख्या अदृश्य शत्रूसोबत युद्ध करीत असल्याचे ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख आरती सिंग यांनी सांगितले.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Malegaon, Nashik