JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / आपला देश कोरोनावर नक्की मात करणार, आरोग्य मंत्रलयाच्या पत्रकार परिषदेत दिलासा देणारी बातमी

आपला देश कोरोनावर नक्की मात करणार, आरोग्य मंत्रलयाच्या पत्रकार परिषदेत दिलासा देणारी बातमी

सोमवारी आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयानं देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात पत्रकार परिषदेत सध्याच्या परिस्थितीविषयी माहिती दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 मे : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला. देशात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1074 रुग्णांनी कोरोनाच्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात केली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयानं देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात पत्रकार परिषदेत सध्याच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 42533 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी, देशात गेल्या 24 तासांत 1074 लोक बरे झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या 24 तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची ही सर्वात जास्त संख्या आहे. दारूची तलफ भागवण्यासाठी तोबा गर्दी, 2 तासात असं काही झालं की आता होताय पश्चाताप आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत एकूण 11706 रुग्ण बरं झाले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 29453 आहे. यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण जर काढला असता तो 27.52 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. सध्या हा दर 25.52 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर देशातील कोव्हिड-19 प्रकरणं दुप्पट होण्याची वेळही 12 दिवस झाली आहे. ही वेळ लॉकडाऊन आधी 3.4 दिवस होती.

संबंधित बातम्या

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जिल्ह्यांना रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागलं गेलं आहे. लॉकडाऊन शिथील करण्यामागचा हेतू म्हणजे व्यवसायातील वाढ, कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि अर्थव्यवस्था मजबूत करणं आहे. गृह मंत्रालयानं लॉकडाऊन 3 अंतर्गत रेड आणि ऑरेंज झोनमध्ये देण्यात आलेली सूट आणि निर्बंधांबद्दलही माहिती दिली. रेड झोनमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील. कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सूट देण्यात आलेली नाही. CRPF जवानांमुळे मोठा हल्ला टळला, नक्षलवाद्यांनी ठेवला होता IED बॉम्ब पण… रेड झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांचीच दुकानं उघडली जातील. ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ रेड झोनमध्ये आवश्यक सेवांशी संबंधित वस्तू वितरीत करण्याची परवानगी आहे. ऑरेंज झोनमध्ये टॅक्सीमध्ये एक ड्रायव्हर आणि दोन प्रवाशांना परवानगी आहे. या परिसरात दुचाकीवर दोन लोकांना बसण्याची परवानगी आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांना दिली जाणार अमेरिकेतली कथित संजीवनी संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या