नाशिक, 04 मे : रविवारी राज्य सरकारच्यावतीने राज्यभरातील दारू विक्री सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनंदेखील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या दीड महिन्यापासून दारू विक्री बंद होती. त्यामुळे तलफ भागवण्यासाठी नाशिकररांनी तोबा गर्दी केली. बघता-बघता अशी काही गर्दी झाली की यावर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागला.
दारू खरेदीसाठी होत असलेली गर्दी बघता प्रशासनाच्यावतीने अवघ्या दोन तासांच्या आतच शहरातील सर्व दारू विक्री दुकानं पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून राज्यभरातील दारूची दुकानं बंद होती. मात्र, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी दारूची दुकानं सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली. सोशल डिस्टंसिंग आणि संचारबंदीच्या नियमांचं पालन करत सशर्त पुन्हा दारूची विक्री सुरू करण्यात आली.
नाशिकमध्ये शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी असलेली दुकानं सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. ही बातमी कानावर येताच दीड महिन्याची दारूची तहान भागवण्यासाठी लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ही गर्दी पाहता कोरोना नावाचा कोणता रोग आपल्या देशातच नाही असं काही दिसलं. कोणालाही हा महागंभीर आजाराची भीती नव्हती.
CRPF जवानांमुळे मोठा हल्ला टळला, नक्षलवाद्यांनी ठेवला होता IED बॉम्ब पण...
ही गर्दी पाहता अवघ्या 2 तासातच प्रशासनाच्या वतिने हा निर्णय मागे घेण्यात आला आणि शहरातील सुरू करण्यात आलेली सर्व दुकानं तात्काळ बंद करण्याचं आदेश पोलीस प्रशासनाकडून काढण्यात आलं. इतकंच नाही चर तळीरामांना मोठ्या प्रमाणात दारू दुकानांबाहेर गर्दी केल्यान अनेक ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. मात्र, तरीही हे लोक पोलिसांना जुमानत नसल्यानं प्रशासनाने सर्व दुकानं तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, दुकानं सुरू करण्यापूर्वी दुकानधारकांना ज्या अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या होत्या त्या अटी व शर्तींचं पालन न केल्यामुळे शहरातील दारू विक्री दुकानांवर कलम 188 नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे तळीरामांचा अतिउत्साहच त्यांना नडला असं म्हणायला हरकत नाही.
लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराची धक्कादायक कारणं आली समोर, पोलिसही झाले हैराण
संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona