Home /News /news /

CRPF जवानांच्या युक्तीने मोठा हल्ला टळला, जेवणाच्या भांड्यात नक्षलवाद्यांनी ठेवला होता IED बॉम्ब

CRPF जवानांच्या युक्तीने मोठा हल्ला टळला, जेवणाच्या भांड्यात नक्षलवाद्यांनी ठेवला होता IED बॉम्ब

नक्षलवाद्यांकडून याआधीही बॉम्ब ठेवण्यात आले होते. पण यावेळी रस्त्याच्या 10 मीटर अंतरावर एका झाडाजवळ जेवणाच्या भांड्यामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता.

    सुकमा (छत्तीसगड), 04 मे : संपूर्ण देशात सध्या कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशात सीआरपीएफचे (CRPF) जवान एका मोठ्या संकटातून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांना (Naxal) स्वयंपाकाच्या एका भांड्यामध्ये आयईडी बॉम्ब (IED Bomb) ठेवला होता. शोधासाठी बाहेर गेलेल्या सैनिकांच्या सतर्कतेमुळे बॉम्ब सापडल्याचा दावा केला जात आहे. दोन भांड्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्ब प्लांट केला होता. सैनिकांना इजा पोहचवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा कट रचला होता. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा (Sukma)जिल्ह्यातील जागरगुंडा मार्गावरील दोर्णपाल गोरगुंडा दरम्यान प्रत्येकी पाच किलोचे दोन आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आले. सीआरपीएफ 223 वाहिनीच्या बीडीएस पथकानं आयईडी बॉम्ब निकामी केले. नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या आत 10 मीटर अंतरावर झाडाजवळ आयईडी प्लांट केला होता. शोध घेणाऱ्या जवानांनी संशयावरून सखोल तपास केला असता त्यांना बॉम्ब सापडले. धक्कादायक : पुण्यातील सिंहगड परिसरात महिलेचा खून शोधासाठी निघाले होते जवान सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच क्षेत्रामध्ये नक्षलवाद्यांकडून याआधीही बॉम्ब ठेवण्यात आले होते. पण यावेळी रस्त्याच्या 10 मीटर अंतरावर एका झाडाजवळ जेवणाच्या भांड्यामध्ये बॉम्ब लावण्यात आला होता. नक्षलवादी सुरक्षा रक्षकांच्या सर्चिंग टीमला टार्गेट करण्यासाठी अशा प्रकार प्लान करतात. सीआरपीएफ 223 वाहिनीचे द्वितीय कमांड अधिकारी सौरभ भटनागर, दीपक कुमार, दोरनापाल एसडीओपी अखिलेश कौशिक, पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश जांगडे हे आयईडी रिकव्हर करताना उपस्थित होते. त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. मोठी अमेरिकन कंपनी करणार JIOमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक,वाचा महत्त्वाचे 5 मुद्दे संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Sukma news

    पुढील बातम्या