Home /News /news /

भारतातल्या कोरोना रुग्णांना दिली जाणार अमेरिकेतली कथित संजीवनी

भारतातल्या कोरोना रुग्णांना दिली जाणार अमेरिकेतली कथित संजीवनी

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अमेरिकेत मंजुरी देण्यात आलेल्या रेमडेसिवीर (Remdesivir) या औषधाची चाचणी भारतातही केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

    नवी दिल्ली, 04 मे : कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) सध्या प्रभावी औषध नाही. उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या औषधांचा आणि उपचारांचे प्रयोग कोरोनाव्हायरसविरोधात होत आहेत.  हायड्रोक्लोरोक्विननंतर आता रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरतंय, असा दावा अमेरिकेनं (America) केला आहे. या औषधाचा कोरोना रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर अमेरिकेनं या औषधाला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी दिली आणि आता भारतातही (India) या औषधाची चाचणी होणार आहे आहे. कोरोनाव्हायरच्या लढ्यात जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या एकत्रित प्रयोगाचा भाग म्हणून रेमडेसिवीर या औषधाची भारतात कोरोना रुग्णांवर चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. हे वाचा - धक्कादायक! हसता-बोलता होताय कोरोना रुग्णांचा मृत्यू, काही तासांतच जातोय जीव CNN-News18 ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं, "सध्या आपण जागतिक आरोग्य संघटनेसह प्रयोगात सहभागी होण्याच्या तयारीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत या औषधाचे 1000 डोस मिळालेत. भारतातल्या काही राज्यांमधील काही रुग्णांवर आम्ही या औषधाचे क्लिनिक ट्रायल करणार आहोत. हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि उच्च स्तरावर त्याबाबत चर्चा सुरू आहे. ICMR आणि CSIR चे शास्त्रज्ञही याबाबत चर्चा करत आहेत" काय आहे  रेमडेसिवीर? अमेरिकेतल्या Gilead या कंपनीचं हे औषध आहे. एबोलासाठी हे औषध तयार करण्यात आलं, मात्र त्यावर प्रभावी ठरलं नाही. आता कोरोनाव्हायरवर हे औषध प्रभावी ठरतं आहे, असा दावा अमेरिकेनं केला आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने 1,063  गंभीर कोरोना रुग्णांवर याची चाचणी केली. प्लेस्बोपेक्षा रेमडेसिवीर औषधामुळे रुग्णांमध्ये 31 टक्के वेगाने सुधारणा होत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर गंभीर कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी या औषधाला अमेरिकेच्या प्रशासनाने मान्यता दिलेली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - Coronavirus चा धोका : तुमच्या त्वचेवर तर अशी लक्षणं नाहीत ना? दुर्लक्ष करू नका
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या