देशात आत्तापर्यंत 4,43,37,201 टेस्टिंग झाल्या आहेत
नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. अशात कोरोनाचा हा प्रकोप 2021पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया (Delhi AIIMS Director Randeep Guleria) यांनी म्हटलं आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही रुग्ण वाढ आणखी काही महिने सुरू राहणार असल्याचं गुलेरिया म्हणाले आहेत. अद्याप कोरोनावर कोणतीही ठोस लस आली नाही. अशात देश अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत कोरोना आणखी वाढेन असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. मोठ्या संख्येने रुग्णवाढ होईन असं मी म्हणत नाही पण रुग्णांची वाढणार अशी चिन्ह आहेत. असं असलं तरी यावर्षीच कोरोनाचा प्रभाव संपण्याचा सर्व यंत्रणेचा प्रयत्न आहे. प्रेमप्रकरणातून थेट रुग्णवाहिकाच पेटवली, emergency असतानाही तरुणांचं गंभीर कृत्य दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर संख्येत विस्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्ण संख्या वाढत असतांनाच शिमल्याच्या IGMC हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर जनक यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती डॉ. जनक यांनी व्यक्त केली आहे. लोकांनी जास्तित जास्त काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. हिवाळ्यात ओलावा जास्त असल्याने कोरोना व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रसाराची भीती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांना जास्त त्रास होतो. त्यामुळे प्रदुषणापासून दूर राहत काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. ‘…तर कंGOना’ शिवसेनेची कंगनावर कडाडून टीका, सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत. योग्य आहार, नियमित व्यायाम, आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं तर आजारापासून दूर राहता येतं असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.