प्रेम प्रकरणातून थेट रुग्णवाहिकाच पेटवली, emergency असतानाही तरुणांचं धक्कादायक कृत्य

प्रेम प्रकरणातून थेट रुग्णवाहिकाच पेटवली, emergency असतानाही तरुणांचं धक्कादायक कृत्य

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

वर्धा, 05 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना वर्ध्यामध्ये रुग्णवाहिका जाळल्याचा धक्कादायक प्रकोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला मारहाण करत आरोपीने थेट रुग्णवाहिकाच जाळून टाकली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी रुग्णवाहिका चालक हा रुग्ण आणण्यासाठी जात होता. यावेळी संघर्ष लोखंडे हा तीन युवकांसह रुग्णवाहिकेचा मालक तन्मय मेश्राम याच्या शोधात आला. यानंतर सरकारी रुग्णालयाजवळ फोनवर चालक बोलत असताना संघर्ष लोखंडे आणि त्याचे सहकारी रुग्णवाहिकेमध्ये चढले आणि तन्मय मेश्रामबाबत विचारू लागले.

'...तर कंGOना' शिवसेनेची कंगनावर कडाडून टीका, सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल

त्यावेळी तन्मय मेश्रामबाबत माहिती न मिळाल्याने संघर्ष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका चालक कुंदन कोकाटेवर हल्ला केला आणि त्याच्यासह रुग्णवाहिका घेऊन पुढं निघाले. दरम्यान कुंदनने गाडीतून उडी घेतली आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.

BREAKING : मुंबईसह नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का

या कालावधीत संघर्ष लोखंडेने साटोडा शिवारात नेलेली रुग्णवाहिका पेटवून दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा अशा प्रकार घडल्यामुळे तरुणांमध्ये पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 5, 2020, 8:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या