मुंबई, 05 सप्टेंबर : चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकिस्तानशी (PoK) केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगणाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कँम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत (Anil Deshmukh) सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही कंगनाविरोधात अनेक ठिकाणी निषेध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी POK शी मुंबईची तुलना करणार्या कंगनाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसले. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशीवर कंगनाने मुंबईची तुलना तुलना पाकिस्तानशी केली. यावर आता शिवसेनेकडून काही पोस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 'ये डर होना चाहिए मुंबई व महाराष्ट्राचा नाद कोणी करू नये!', 'मुंबई POK वाटते तर... कंGOना' अशा शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.
इतकंच नाही कर जिन्हें लगता है, 'मुंबई SAFE नहीं, THEY CAN GO ना' असं पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.
कंगना हिच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाचं नाव न घेता तिला फटकारलं आहे. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.