किरण मोहिते, प्रतिनिधी सातारा, 30 जून : भारत आणि चीन सीमा रेषेवरील तणाव पूर्ण वादावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी कुणी राजकारण करू नये, असा सल्ला दिला होता. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भारत-चीन प्रश्नी राजकारण न करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्या व्यक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणारच. आम्ही काही घरगुती कामासाठी प्रश्न विचारत नसून जनतेसाठी आणि जनतेचा आवाज म्हणून प्रश्न विचारत आहोत’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. 1 जुलैपासून बदलणार आर्थिक व्यवहारासंबंधित हे नियम,माहित नसल्यास होईल मोठे नुकसास तसंच, ‘सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे म्हणजे, विरोध करणे असं होत नाही. त्यांचे जे विचार काही असतील ते मान्य आहे. पण, आमचे विचार हे स्पष्ट आहे’ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. काय म्हणाले होते शरद पवार? ‘भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही’, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. पेट्रोलिंगला निघालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यालगत मिळाला मृतदेह ते पुढे म्हणाले, ‘1993 साली देशाचा संरक्षण मंत्री असताना मी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी काही सीमांवर बंदुकीचा किवा शस्त्राचा वापर करायचा नाही असा करार करायची चर्चा चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी केली होती. त्यावर पुढील काळात नरसिंहराव यांनी पुन्हा चीन दौरा करून तो करार अमलात आणला.’ आपल्याला चीनशी लढायचे आहे, विरोधकांशी नाही - शिवसेना दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून चीन प्रश्नावर ‘ट्यून बदला हो!’ या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यात भाजपला टोला लगावण्यात आला. ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच’ अशी आठवणही सेनेनं करून दिली. महाराष्ट्राच्या मातीची ओळख मोजतेय शेवटची घटका, बळीराजाचे ‘मार्ट’ संकटाच्या खाईत सीमेवरील गलवान खोर्यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे.चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे. आपल्याला चीनशी लढायचे आहे हे बहुतेक सगळेच विसरलेले दिसतात. ’ असा टोला भाजपला लगावण्यात आला. संपादन - सचिन साळवे