धक्कादायक! पेट्रोलिंगला निघालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यालगत मिळाला मृतदेह

धक्कादायक! पेट्रोलिंगला निघालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यालगत मिळाला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार दोन पोलीस कर्मचारी रात्री 12 वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते.

  • Share this:

सोनीपत, 30 जून : पेट्रोलिंगसाठी निघालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सोमवारी गस्तीवर बाहेर गेलेल्या दोन पोलिसांना अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केलं. ही बाब समजताच पोलिस विभागात खळबळ उडाली. बडोदा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या बुटाणा या गावात पोलिस चौकीच्या दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार केल्याचे स्पष्ट करा. चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला.

हे वाचा-महाराष्ट्राच्या मातीची ओळख मोजतेय शेवटची घटका, बळीराजाचे 'मार्ट' संकटाच्या खाईत

मिळालेल्या माहितीनुसार दोन पोलीस कर्मचारी रात्री 12 वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते. पोलीस चौकीपासून 500 मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली आहे. दोन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच बडोदा पोलिस ठाण्याचे एएसपी उदयसिंग मीणा, एसएचओ उदयसिंग मीना यांच्यासह विविध पोलिस ठाण्याचे आणि गुन्हे अन्वेषण यंत्रणेचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी विविध बाबी लक्षात घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 11:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading