छत्तीसगड, 05 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर (Bijapur) जिल्ह्यात मेटपाल आणि पुसनार गावातून दोन दिवसांपूर्वी 26 नागरिकांचे माओवाद्यांनी अपहरण केल होते. यात चौघांची हत्या केली असून 16 नागरिक अजूनही माओवाद्यांच्या ताब्यात आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दंतेवाडा जिल्ह्यात गुरुवारी माओवाद्यांनी दोन जणांची हत्या केली होती. आज ही दुसरी घटना उघड झाली आहे. तसंच बिजापूर येथील कुटरू येथून एएसआय (ASI) नागैय्या कोरसा यांची माओवाद्यांनी हत्या केली. माओवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी कोरसा यांचं अपहरण केले होते. कोरसा हे पोलीस स्टेशनमधून सुट्टी घेऊन घरी गेले होते, त्यानंतर माओवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं. पुण्यातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग, घटनास्थळाला पहिला VIDEO ASI अधिकाऱ्याचं अपहरण करून हत्या माओवाद्यांनी कोरसा यांची हत्या करून मृतदेह हा रस्त्यावर फेकून दिला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेमुळे कुटरू गावात दहशतीचे वातावरण आहे. कुटरू पोलीस स्टेशनमध्ये एएसआय यांना सलामी देऊन अखेरचा निरोप दिला जाणार आहे. एका दिवसाआधीच त्यांचं अपहरण करण्यात आले होते. कंगनाला 9 तारखेला येऊ तर द्या.. शिवसेनेचा सज्जड इशारा, काय म्हणाले संजय राऊत बिजापूरमधील चेरामंगी गावाचे नगैय्या कोरसा हे रहिवासी होते. गावातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांचा मुलगा दीपक याने आपल्या वडिलांना सोडून द्यावे अशी दया याचना केली होती. पण, त्यांचा कोणताही परिणाम झाला. कोरसा यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,