पुण्यातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागली आग, घटनास्थळाला पहिला VIDEO

आग लागल्यामुळे हॉस्पिटलच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

आग लागल्यामुळे हॉस्पिटलच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

  • Share this:
    पुणे, 05 सप्टेंबर : पुण्यातील गोळीबार मैदानाजवळ असलेलं कॅटोनमेंट हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. कॅटोनमेंट हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ही घटना घडली. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये अचानक आग लागली. आग लागल्यामुळे हॉस्पिटलच्या परिसरात एकच खळबळ उडाली.  आयसीयूमध्येच ही आग लागल्यामुळे कर्मचाऱ्यांनी धावाधाव केली. या घटनेची माहिती तातडी अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी  अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहे. आयसीयूमधील  एसीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published: