कंगनाला 9 तारखेला मुंबईत येऊ तर द्या.. शिवसेनेचा सज्जड इशारा, काय म्हणाले संजय राऊत?

कंगनाला 9 तारखेला मुंबईत येऊ तर द्या.. शिवसेनेचा सज्जड इशारा, काय म्हणाले संजय राऊत?

शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एक पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे. तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचा कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. कंगनाला 9 तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा...कंगनाला उपरती! म्हणाली, मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं...

शिवसेना खासदार यांनी 'News18 लोकमत' शी बोलताना सांगितलं की, शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दात टिप्पणी करत असेल तर हा एक पक्षाचा विषय नाही. 11 कोटी जनतेचा विषय आहे. कंगनाला मराठी समजत का? तिनं स्वतःचा ट्विटर हँडल स्वतः हँडल करावा. कोणत्या राजकीय पक्षाच्या आयटी टीमला द्यायची काय गरज आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, कंगनानं मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही आहे. मात्र, त्यांनी हे जरा अधिक जोरात बोललायला हवं होतं. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

हे आंदोलन फक्त शिवसेनाच आहे का? तर नाही कालच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पोस्टरवर मत मागायला शिवाजी महाराज नसतात. तसेच काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील स्पष्ट केलं आहे की, कंगनाला महाराष्ट्रात राहाण्याचा अधिकार नाही.  मात्र, अमृता फडणवीस आणि रामदास आठवले यांनी केल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं संजय राऊत यांनी टाळलं.

शिवसेनेनं पुकारले सोशल आंदोलन

दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेनेनं सोशल मीडियावर आक्रमक कॅम्पेन सुरू केलं आहे. शिवसेनेकडून वेगवेगळे आक्रमक पोस्टर तयार केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील राजकारण तीव्र झालं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत (Anil Deshmukh) सर्व स्तरातून कंगनावर टीका करण्यात येत आहे.

हेही वाचा...कंगना भडकली! 'किसी के बाप का नही हैं महाराष्ट्र...उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?'

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही कंगनाविरोधात अनेक ठिकाणी निषेध केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी POK शी मुंबईची तुलना करणार्‍या कंगनाविरोधात रस्त्यावर उतरतानाही दिसली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जच्या चौकशीवर कंगनाने मुंबईची तुलना  पाकिस्तानशी केली. यावर आता शिवसेनेकडून काही पोस्टर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 'ये डर होना चाहिए मुंबई व महाराष्ट्राचा नाद कोणी करू नये!', 'मुंबई POK वाटते तर... कंGOना' अशा शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 5, 2020, 1:24 PM IST

ताज्या बातम्या