JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पुण्यात शिवशाही बसचा भीषण अपघात, ओव्हरटेक करताना महामार्गावरच उलटली

पुण्यात शिवशाही बसचा भीषण अपघात, ओव्हरटेक करताना महामार्गावरच उलटली

या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचं संकट असताना रविवारी मात्र मोठ्या उत्साहात भाविकांनी दीड दिवसाच्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सगळीकडे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असताना पुण्यात रविवारी रात्री भीषण घडला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे रविवारी रात्री 10 च्या सुमारास शिवशाही बसचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हर टेक करताना शिवशाही बस महामार्गावरच उलटली झाली. बस पलटी झाल्याने अपघात 8 ते 10 जण जखमी किरकोळ जखमी झाले तर या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कळंब कॉलनीजवळ नाशिकवरून पुण्याकडे ही बस येत होती. बसमध्ये 8 ते 10 प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मंचर इथल्या खाजगी रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले. कोरोनापासून वाचण्यासाठी 50 टक्के लोकांना दिलं होमियोपॅथी औषध, झाला वाद याआधी वारंवार शिवशाही बसचा अपघात घडल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर एसटी बसचा हा पहिलाच अपघात घडला असल्याने या वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातही अपघात झाला होता. दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर मालवाहतूक ट्रक पलटी झाला. तसंच दुचाकीवरील दोघे खाली पडून जखमी झाले. या दोघांनाही राजगुरुनगर पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घाट परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहनं सावकाश चालवा अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या