Home /News /maharashtra /

मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन

मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन

'खराची एक तो धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे वाक्य खरं करून दाखवणारी एक सकारात्मक घटना समोर आली आहे.

अहमदनगर, 23 ऑगस्ट : 'खराची एक तो धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे वाक्य खरं करून दाखवणारी एक सकारात्मक घटना समोर आली आहे. आज जातीच्या नावाखाली अनेकांचे बळी जात आहे. ऑनरकीलिंग सारख्या घटना घडत आहेत. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावातील घटनेनंतर तुम्ही हे सगळं विसरून जालं. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव जवळील मुंगी या छोट्या गावात एका लग्नात एका मुस्लीम मामाने आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलीचं कन्यादान केलं आहे. इतकंच नाही तर लेकही बापाला निरोप देताना जशी रडते तसं अश्रू तिच्या डोळ्यांत होते. या घटनेची आज सर्वदूर चर्चा होत आहे. भाजपच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण, घरातील 5 जण निघाले पॉझिटिव्ह अहमदनगर जिल्ह्यातील  शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आई-वडिलांकडे राहत आहेत. माहेरीच छोटं-मोठं काम करून त्यांच्या मुलींना मोठं केलं. मुलींच्या आईला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन भावाचे कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली. पती प्रेयसीसोबत बेडरूममध्येच राहायचा, वैतागून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल शेवगाव तालुक्यातील मुंगी याठिकाणी झालेल्या या लग्नात फोटोग्राफरच्या एका क्लिकने मन सुन्न झालं आणि सामाज्याच्या ठेकेदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. खरंतर हीच आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणूसकी हा खरा धर्म प्रत्येकाला ओळखता येणं गरजेचं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या