Home /News /national /

कोरोनापासून वाचण्यासाठी या राज्यातल्या 50 टक्के लोकांना दिलं होमियोपॅथी औषध, वादाची पडली ठिणगी

कोरोनापासून वाचण्यासाठी या राज्यातल्या 50 टक्के लोकांना दिलं होमियोपॅथी औषध, वादाची पडली ठिणगी

हे औषध घेण्याऱ्या 99 टक्के लोकांना संक्रमण झालं नाही असा दावाही सरकारने केला आहे.

    गुजरात 23 ऑगस्ट: गुजरातमध्येही कोरोनाचा प्रकोप आहे. रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. आता असं असतांना सरकारने देलेल्या माहितीवरून टीका होत आहे. प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून राज्यातल्या 50 टक्के जनतेला होमियपॅथी औषध दिल्याचं सरकारने म्हटलं आहे. सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला जो अहवाल पाठवला त्यात ही माहिती देण्यात आलीय. आर्सेनिकम अल्बम-30 हे ते औषध असून त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचं सरकारने म्हटलं आहे. तर याबाबत शास्त्रीय प्रयोग झालेला नसतांना असं औषध का दिलं अशी टीका होत आहे. 3 कोटी 48 लाख लोकांना हे औषध देण्यात आलं आहे. देशातल्या अने राज्यांमध्ये हे औषध दिलं गेलं मात्र त्याचे शास्त्रीय प्रयोग झाले नाहीत. त्यामुळे सरकारने असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करणं योग्य नसल्याची टीका काही तज्ज्ञ डॉक्टरांनी केली आहे. हे औषध घेण्याऱ्या 99 टक्के लोकांना संक्रमण झालं नाही असा दावाही सरकारने केला आहे. दरम्यान, WHO च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत. WHOने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो. जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे. WHOने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचेही सांगितले होते. WHOच्या मते, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर, 5 वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या