JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / या चिमुकलीचं करावं तितकं कौतूक कमी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तोडली पिगी बँक

या चिमुकलीचं करावं तितकं कौतूक कमी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तोडली पिगी बँक

देश असा कठीण काळात असताना बरेच मदतीचे हात समोर आले. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 09 एप्रिल : कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय ठप्प असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. देश असा कठीण काळात असताना बरेच मदतीचे हात समोर आले. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. अमरावती इथल्या एका 5 वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. अमरावती येथील रूधिरा जितेंद्र दखने या पाच वर्षांच्या चिमुकलीने गत दोन वर्षांत आपल्या पिगी बँकेत जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेचे समाजातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत आहे. रूधिरा ही अमरावतीच्या होलिक्रॉस शाळेची केजी वनची विद्यार्थिनी आहे. हे वाचा - कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, पोलिसांचा शोध सुरू वाढदिवस किंवा इतर विविध कार्यक्रमांत तिला पाहुण्यांकडून खाऊ म्हणून मिळालेली रक्कम ती दोन वर्षांपासून आपल्या पिगी बँकेत साठवून ठेवत होती. सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून मदतीचे आवाहन केले असताना रूधिरानेही आपल्या खाऊची 2 वर्षांत जमा झालेली तीन हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निश्चय केला. हे वाचा - BREAKING: कोरोनामुळे या राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन तिचे वडील पत्रकार जितेंद्र दखने यांनी हा निधी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या सुपुर्द केला. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. हे वाचा -  पुण्यात कोरोचा कहर वाढतोय, आणखी दोघांचा मृत्यू, एकूण आकडा 20वर संकलन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या