ओडिशा, 09 एप्रिल : कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ओडिशामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 14 एप्रिलवरून आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ओडिशा सरकारने देशातील कोरोना विषाणूची सुरू असलेल्या कहरामुळे लॉकडाऊन कालावधी वाढविला आहे. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोना लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून असं करणारं हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 17 जूनपर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारला 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याचे आवाहन केले आहे.
#COVID19: Odisha extends lockdown till April 30th, the first state to do so pic.twitter.com/8t3FgFlOft
— ANI (@ANI) April 9, 2020
ओडिशा सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा केंद्र सरकार देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा विचार करीत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजकीय पक्षांशी बोलताना सांगितले की, 14 एप्रिलला लॉकडाऊन हटविणे शक्य नाही असं मोदींनी म्हटलं होतं. शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पीएम मोदी लॉकडाऊन संदर्भात अंतिम निर्णय घेऊ शकतात, असा विश्वास आहे. यापूर्वी, देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची अंमलबजावणी केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि कोरोनाशी सामोरे जाण्याच्या तयारीविषयी विचारपूस केली. त्याचबरोबर सरकारी सूत्रांनी सांगितले होते की सरकार कित्येक राज्यांकडून विनंत्या मिळाल्यानंतर लॉकडाऊन मुदत वाढविण्याच्या विचारात आहे. ओडिशामध्ये कोरोनाचे किती रुग्ण ? ओडिशामध्ये कोरोनाचे रुग्ण ओडिशामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 45 प्रकरणे नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ओडिशामध्ये कोरोना विषाणूची लागण होणारी संख्या 45 आहे. यातील दोन जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.