धक्कादायक! कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, रुग्णालयाची चूक पडणार महागात

धक्कादायक! कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, रुग्णालयाची चूक पडणार महागात

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एक चूक संपूर्ण शहराला पडणार महागात. पोलीस घेत आहेत रुग्णाचा शोध.

  • Share this:

चेन्नई, 09 एप्रिल : देशभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. तसेच जवळपास प्रत्येक शहरात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. असे असूनही, रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडून होणाऱ्या चुका महागात पडत आहेत. असाच प्रकार तमिळनाडू येथील रुग्णालयात घडला. विलीपुरममधील एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यांनतर कळले की त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूसंदर्भात त्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे त्याला मंगळवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार आणखी दोन रुग्णांसोबतही घडला. यातील दोन रुग्णांना शोधून पुन्हा दाखल करण्यात आले. पण तिसरा व्यक्ती अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे पोलीस सध्या या रुग्णांचा शोध घेत आहेत.

वाचा-लॉकडाऊनमध्ये 70 किलोमीटर चालून प्रियकराला भेटण्यासाठी आली तरुणी

निष्काळजीपणाचे पहिले प्रकरण नाही

हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची ही पहिली घटना नाही. गेल्या आठवड्यातही रुग्णालय प्रशासनाने रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाचे शव कुटुंबियांना दिले. त्यानंतर मृत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. किमान 50 लोक त्याच्या अंत्यसंस्कारात पोहोचले. या सर्वांना आता कोरोना विषाणूची भीती आहे.

वाचा-केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांची संख्या 700 पेक्षा जास्त आहे. तर राज्यात आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. असे म्हटले जाते की निझामुद्दीन, दिल्ली येथे तबलीगि जमातमध्ये सहभागी झालेल्या किमान 679 रूग्ण आहेत.

वाचा-BREAKING: कोरोनामुळे या राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाऊन

संपादन-प्रियांका गावडे

First published: April 9, 2020, 2:24 PM IST

ताज्या बातम्या