ऑनलाईन गेमिंगमुळे मुलाची झाली वाईट अवस्था
नवी दिल्ली, 16 जुलै : सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपला अधिक वेळ मोबाईलवर घालवताना दिसतात. फोटो, व्हिडीओ, गेम, या गोष्टी करण्यात लोक आपला वेळ घालवतात. मात्र जास्त वेळ मोबाईल वापरणं धोकादायक आहे. यामुळे अनेकांच्या डोळ्यावर, डोक्यावरही परिणाम होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये एका मुलाला गेम खेळून डोक्यावर परिणाम झाला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. गेम खेळून एका मुलाच्या डोक्यावर परिणाम झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना राजस्थानमधून समोर आलीय. 12 वर्षाच्या मुलाचं PUBG खेळून मानसिक संतुलन बिघडलं आहे.
सातवीत शिकवणारा 14 वर्षांचा मुलगा 15 तासांपेक्षा अधिक वेळ फायर फ्री आणि PUBG खेळायचा. या ऑनलाईन गेम्स खेळून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. सात महिन्यांपासून तो ही गेम खेळत होता. या गेममुळे तो अभ्यासापासूनही दुरावला. त्याची प्रकृती इतरी बिघडली की, त्याला आता कुटुंबियांनी अंपग संस्थेत उपचार घेण्यासाठी त्याला दाखल केलं आहे. Viral Video : अन् किचनमध्ये अचानक फुटला कुकर, मुलाच्या तोंडावर उडाला आणि…. मुलगा गेम खेळण्याचा हट्ट करतो यामुळे त्याला कधी कधी बांधूनही ठेवावं लागतं. मनोपचार तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरची टीम त्याच्यावर उपचार करत आहेत. या मुलाची आई सफाई कामगार म्हणून काम करते तर वडिल रिक्षाचालक आहेत. आईवडिल कामाला गेल्यावर तो 14,15तास फक्त गेम खेळायचा. हातात मोबाईल नसला तरी तो फायर फायर ओरडतो.
दरम्यान, मोबाईलमुळे परिणाम झालेली अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात. लहान मुलांच्या बाबतीत ही प्रकरणे अधिक पहायला मिळतात. कमी वयात मोबाईलच्या आहारी जाऊन ते आपलं हेल्थही खराब करुन घेत आहेत.