जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : अन् किचनमध्ये अचानक फुटला कुकर, मुलाच्या तोंडावर उडाला आणि....

Viral Video : अन् किचनमध्ये अचानक फुटला कुकर, मुलाच्या तोंडावर उडाला आणि....

अन् किचनमध्ये अचानक फुटला कुकर

अन् किचनमध्ये अचानक फुटला कुकर

महिला पुरुष सर्वचजण किचनमध्ये काम करत असतात. मात्र अनेकदा किचनमध्ये काम करताना दुर्घटनाही घडतात. अचानकपणे काहीतरी फुटतं, तुटतं त्यामुळेच किचनमध्ये काम करताना सावधानता बाळगण्यास सांगितलं जातं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जुलै : महिला पुरुष सर्वचजण किचनमध्ये काम करत असतात. मात्र अनेकदा किचनमध्ये काम करताना दुर्घटनाही घडतात. अचानकपणे काहीतरी फुटतं, तुटतं त्यामुळेच किचनमध्ये काम करताना सावधानता बाळगण्यास सांगितलं जातं. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये किचनमध्ये अचानकपणे दुर्घटना घडते. तुम्हीही किचनमध्ये काम करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. एक मुलगा किचनमध्ये काम करताना करत असतो. अचानकपणे किचनमध्ये कुकरचा स्फोट होतो. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. त्यामुळे कुकर जेवढा स्वयंपाक करण्यासाठी सोयीस्कर ठरतो तेवढाच तो धोकादायकही.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खोलीत खाद्यपदार्थ ठेवलेल्या काही प्लेट्स दिसत आहे. तिथे एक मुलगाही उभा दिसतो, जो किचनमध्ये काहीतरी घेण्यासाठी जातो. तो नुकताच भांड्यातून काहीतरी काढून ताटात टाकत असतो, की अचानक गॅसवर ठेवलेला कुकर फुटतो आणि त्यातून गॅस निघतो. काही सेकंदात मोठा स्फोट होतो आणि कुकर उडून मुलाच्या तोंडावर पडतो. मुलगा लगेच बाजूला होतो त्यामुळे त्याला जास्त इजा होत नाही. अन्यथा अशा स्फोटमध्ये एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.

जाहिरात

@funny_bebo_306 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. किचनमधील हा व्हिडीओ जोरदार व्हायरल असून अनेक लोक व्हिडीओवर कमेंट करत आहेत. दरम्यान, स्वयंपाक घरातील अशा घटना कायमच समोर येत असतात. यामध्ये कधी कोण गंभीर जखमी होतं तर कधी काहींना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे किचनमध्ये काम करणं कठिण असून काळजी घेणं गरजेची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात