JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊन हटवण्याआधी करा 'ही' तयारी, WHOने सर्व देशांना दिल्या सूचना

लॉकडाऊन हटवण्याआधी करा 'ही' तयारी, WHOने सर्व देशांना दिल्या सूचना

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना काही सुचना केल्या आहेत. यात लॉकडाऊन हटवण्याआधी तयारी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

जाहिरात

Pune: Barricades are seen at Khadki Cantonment after seven family members of a COVID-19 positive patient tested positive for the coronavirus infection during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Pune, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000124B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असला तरी काही देशांमध्ये मृत्यू दर कमी होताना दिसत आहे. परिणामी काही देशांनी लॉकडाऊन शिथील करण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सर्व देशांना काही सुचना केल्या आहेत. यात लॉकडाऊन हटवण्याआधी तयारी करणे गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. WHOच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊन हटवण्याआधी जास्तीत जास्त चाचण्या होणं गरजेचं आहे. ज्यामुळं कोरोनाचा प्रसार किती आणि कसा होत आहे, याबाबत माहिती मिळेल. भारतातही 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. आता मुख्य हॉटस्पॉट क्षेत्र वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेण्याची शक्यता आहे. याकरिता आज पंतप्रधन राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. वाचा- कोरोनाविरोधातील लढाई आता आणखी अवघड, लसीबाबत ब्रिटनमधून आली मोठी बातमी भारतात रोज दीड लाख चाचण्या होत आहेत तज्ज्ञांच्या मते भारतात लॉकडाऊनमध्ये काही सूट दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त चाचण्या करणे गरजेचे आहे. ICMRने दिलेल्या माहितीत 26 एप्रिलपर्यंत देशात 6 लाख 25 हजार 309 चाचण्या झाल्या आहेत. अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्रमुख डॉ. फहीम युनूस यांच्या मते, भारत एका महिन्यात दररोज दीड लाख चाचण्यांची आवश्यकता आहे. वाचा- लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याला आता 6 फुटांवरून पकडणार पोलीस, VIDEO VIRAL अमेरिका लक्ष्यापासून दूर जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत आतापर्यंत एकूण 40 लाख 69 हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत. परंतु हा आकडा रॉकफेलर फाऊंडेशनच्या शिफारशींपेक्षा खूपच कमी आहे, या शिफारशीमध्ये लॉकडाऊमध्ये सूट देण्यापूर्वी अमेरिकेला पुढील दोन महिन्यांसाठी दर आठवड्यात किमान 3 लाख चाचण्या घेण्याची आवश्यकता होती. अमेरिकेत सध्या रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 18.8 टक्के आहे. WHOच्य म्हणण्यानुसार, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा वाढता दर असे दर्शवतात की, चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळं लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेण्याआधी जास्ती जास्त चाचण्या होणे गरजेचे असल्याचे मत, WHOने व्यक्त केले आहे. वाचा- कोरोना रुग्णांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्या आकड्यांमध्ये मोठा फरक संपादन, संकलन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या