Home /News /news /

कोरोना रुग्णांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्या आकड्यांमध्ये मोठा फरक

कोरोना रुग्णांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्या आकड्यांमध्ये मोठा फरक

तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना तातडीने क्वारंटाइन करणंही शक्य होणार आहे.

तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना तातडीने क्वारंटाइन करणंही शक्य होणार आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) आणि नॅशनल कोआपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरपोरेशन(NCDC)या दोन्ही संस्था कोरोनाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवतात. परंतु, या दोन संस्थांनी दिलेली आकडेवारी जुळत नाहीये.

    नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या दोन सरकारी संस्था देशातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या आणि मृत्यू यावर लक्ष ठेवून आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) आणि नॅशनल कोआपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरपोरेशन(NCDC)या दोन्ही संस्था कोरोनाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवतात. परंतु, या दोन संस्थांनी दिलेली आकडेवारी जुळत नाहीये. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रविवारी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि राज्यांचे आरोग्य सचिव उपस्थित होते. अशा परिस्थितीत कोरोनाचे काही प्रकरणांकडे लक्षच दिलं नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. दोन्ही संस्थांच्या आकड्यांमध्ये फरक 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास, एनसीडीसीने म्हटले आहे की भारतात कोरोना रूग्णांची एकूण संख्या 26496 आहे, तर आयसीएमआरने म्हटले आहे की देशातील एकूण रुग्णांची संख्या 27853 आहे. म्हणजे इथं एकूण 1087 रुग्णांचा फरक दिसून आला. सादरीकरणाच्या वेळी असं दिसून आलं की, एनसीडीसी आणि आयसीएमआरची आकडेवारी फक्त 8 जागेवर समान आहे. ही पूर्वोत्तर, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप अशी 5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. या आठ जागांपैकी चार ठिकाणी एकही प्रकरणं नाहीत आणि केवळ एका राज्यात 2 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत. मेघालयात 12 प्रकरणं आहेत. या राज्यांमध्ये आहे अधिक फरक एनसीडीसीच्या तुलनेत आयसीएमआर रेकॉर्डमध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक फरक महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये नोंदवला गेला आहे, जिथे आयसीएमआर डेटा अनुक्रमे 8,848, 3,809 आणि 770 दर्शवितो. एनसीडीसीच्या आकडेवारीनुसार अनुक्रमे 7,628, 3,071 आणि 611 प्रकरणे आहेत. एनसीडीसीने या राज्यात दर्शविली अधिक संख्या अशी आठ राज्ये आहेत जिथे एनसीडीसीची संख्या आयसीएमआरपेक्षा जास्त आहे. दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्यात आकड्यांमध्ये मोठा फरक आहे. उदाहरणार्थ, दिल्लीची एनसीडीसी संख्या 2,625 आहे. तर आयसीएमआर ही संख्या 2,155 दाखवते. मग बाकी रुग्ण गेले कुठे किंवा कोणता आकडा नेमका खरा यावर आता नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या