चंदीगढ, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगानं वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. काही तरुण लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. या तरुणांना शिक्षा दिली तरीही अनेक भागांमध्ये तरुण वारंवार उल्लंघन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थित समोरच्या तरुणाला कोरोना असेल तर संक्रमण पोलिसांना होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. अशावेळी पोलिसांचं कर्तव्य आणि नियम मोडणाऱ्यांना शिक्षा अशा दोन्ही गोष्टी सफल व्हाव्यात म्हणून सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. चंदीगढ पोलिसांनी यासाठी एक युक्ती वापरली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 6 फूट लांब राहून आता पोलिसांना नियम मोडणाऱ्या तरुणांवर कारवाई करता येणार आहे. महासंचालक संजय बेनीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला पकडताना दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये उपस्थित व्यक्तीने सेल्फ क्वारंटाइनच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे. त्या व्यक्तीला पकडताना सोशल डिस्टन्स पाळून या टेक्ननिकचा वापर करून तरुणांना पकडता येणार आहे. हे वाचा- देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, टॉप 5 मध्ये या राज्यांचा समावेश
स्पर्श न करता आता या तरुणांना पकडणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या जीवाला धोका कमी होणार आहे. देशात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची 1990 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 26 हजारांचा टप्पा पार केला आहे. भारतात आजपर्यंत कोरोनाचे एकूण 26 हजार 496 रुग्ण आढळले आहेत. तर 804 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला आहे. हे वाचा- कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस घेतोय कमी जीव