लंडन, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावरील लसीची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी असा दावा केला होता की, या वर्षाअखेरीस कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध असेल. यासाठी काही देशांमध्ये लसीच्या चाचणीसही सुरुवात झाली होती. यात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसी संदर्भातील संशोधनाकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आता ब्रिटनमधील एका मंत्र्यानं या वर्षाअखेरीस तयार होण्याची शक्यता कमी आहे, असे सांगितले आहे. त्यामुळं कोरोनाला मात देणे आणखी कठिण होणार आहे.
ब्रिटनचे मंत्री डॉमनिक रॉब यांनी रविवारी दिलेल्या निवेदनात असे सांगितले की, "आम्ही प्रयत्न करत आहोत की लवकरात लवकर कोरोनाचा नाश होईल. यासाठी आम्ही सज्ज आहोत. एक लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र या वर्षाअखेरील ही लस तयार होणे अशक्य आहे". रॉब यांनी असेही सांगितले की, सध्या लोकांच्या चाचण्या करण्यावर जास्त भर दिला जात आहे. ज्यावरून हा व्हायरस कसा पसरत आहे, याची माहिती मिळेल.
वाचा-ज्या विहानमधून जगभर कोरोना पसरला तिथे आता एकही रुग्ण नाही!
दरम्यान, ब्रिटनच्या या मंत्र्यानं लसीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. कारण हे वक्तव्य ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं कोरोनाची लस तयार करण्यासाठी एका महिलेवर चाचणी केल्यानंतर आले. अद्याप या महिलेवर केलेल्या चाचणीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे.
वाचा-कोरोना रुग्णांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्या आकड्यांमध्ये मोठा फरक
कोरोनाची सर्वात मोठी चाचणी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या चाचणीत यश मिळण्याचं प्रमाण 80 टक्के इतकं असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंड सरकारने यासाठी 20 मिलियन पौंडांची तरतूद केली आहे. इंग्लंडच्या आरोग्य सचिवांनी सांगितंल की, सरकार कोरोनाला रोखणारी लस शोधण्यासाठी जे करता येईल ते करण्यास तयार आहे. ब्रिटनमध्ये 165 रुग्णालयात तब्बल 5 हजार रुग्णांवर एक महिन्यापर्यंत आणि अशाच पद्धतीने युरोप आणि अमेरिकेतील शेकडो लोकांवर या लसीचे परीक्षण होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर पीटर हॉर्बी यांनी सांगितलं की, ही जगातील सर्वात मोठी चाचणी आहे. पीटर हॉर्बी हे याआधी इबोलाच्या औषधाची ट्रायल घेणाऱ्या टीमचे नेतृत्व करत होते. दरम्यान, ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी दावा केला आहे की, दोन वॅक्सिन यावेळेला सर्वात पुढे आहेत. एक ऑक्सफर्डमध्ये आणि दुसरी इम्पिरियल कॉलेजमध्ये तयार केली जात आहे.
वाचा-दाट लोकसंख्या, प्रचंड गरीबी तरी विकसित देशापेक्षा दक्षिण आशियात कोरोनाचा कहर कमी
संकलन, संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona