JOIN US
मराठी बातम्या / देश / आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल

आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, दुसरीकडे मात्र लॉकडाऊनमुळे कामे ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 मे : सध्या देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारने 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र 17 मेनंतर पुढे काय असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस खासदार राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्यानुसार सोनिया गांधी यांनी लॉकडाऊन 3 चा कालावधी संपल्यानंतर पुढे काय? आणि कोणतं धोरण राबवणार आहोत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला आहे. सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 41 दिवसांत देशात कोरोनाबाधितांची संख्या 40000 च्या पुढे गेली आहे. मात्र यावर नियंत्रण आणणे अवघड जात आहे. दुसरीकडे लॉकडाऊन असल्याने सर्व कामं ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा हाल होत आहे. अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत असल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संबंधित -  विविध जिल्ह्यात अडकलेले नागरिक कसे पोहोचणार घरी? सरकारनं घेतला मोठा निर्णय मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या