JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनामुळे 18 दिवस व्हेंटिलेटरवर सुरू होती मृत्यूशी झुंज, 4 महिन्यांच्या चिमुकलीनं जिंकलं युद्ध

कोरोनामुळे 18 दिवस व्हेंटिलेटरवर सुरू होती मृत्यूशी झुंज, 4 महिन्यांच्या चिमुकलीनं जिंकलं युद्ध

4 महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

जाहिरात

ani

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाखापट्टणम, 13 जून : कोरोनामुळे 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या 4 महिन्यांच्या चिमुकलीनं कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथली आहे. देशभरातील या चिमुकलीचं कौतुक केलं जात आहे. तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर या चिमुकलीला ठेवण्यात आलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी या चिमुकलीचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यानं तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी पूर्व परिसरात आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या महिलेला 19 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यानंतर तिच्या 4 महिन्यांच्या बाळाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चिमुकलीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्यानं तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

संबंधित बातम्या

4 महिन्यांच्या चिमुकलीची प्रकृती पाहता तिला विशाखापट्टणम इथल्या VIMS रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे 18 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी या चिमुकलीची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. विशाखापट्टणम इथे शुक्रवारी 14 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हे वाचा- 7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि… देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा- पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाला लागण हे वाचा- प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना, दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या