जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि...

7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि...

7 दिवसांच्या बाळाच्या इवल्याशा ह्रदयात 3 ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळालं आणि...

मी 10 ते 12 हजार रुपये कमवणारा माणूस आहे, आठ दिवस झाले अजून बाळाची प्रकृती नाजूक आहे. माझ्याकडे पैसे नाही, मी काही करू शकतं नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

रामाकांत तिवारी,प्रतिनिधी मुंबई, 13 जून : सात दिवसांच्या नवजात बाळाच्या प्रकृतीमुळे एक बाप प्रचंड अस्वस्थ होता. जन्मताच या बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बाळाचे कुटुंबीय हवालदील झाले होते.  शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना या बाळाबद्दल माहिती मिळाली आणि तातडीने 1 लाखांची मदत पुरवली. या बाळाचा वैद्यकीय खर्च देखिल उचलण्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. घनसोली परिसरात राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण, दुसऱ्याच क्षणाला हे वातावरण चिंतेत बदललं. या नवजात बाळाला ह्रदयाशी संबंधीत आजार असल्याचं समोर आलं. सात दिवसांच्या या बाळाच्या ह्रदयात 3 ब्लॉक आढळून आले. तसंच ह्रदयात एक छेदही आढळून आला. एरोली येथील महापालिकेच्या रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाचा जन्म होताच त्याचा जीव धोक्यात सापडला होता. हेही वाचा- गर्दीत कसा ओळखणार कोरोनाबाधित? सेनेच्या नगरसेवकाने सुचवला रामबाण उपाय शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी या बाळाला नेरुळ येथील मंगल प्रभु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सुचना केली. त्यानंतर बाळाला तातडीने या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. परंतु, बाळाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे अन्सारी यांनी आपल्या बाळाला मुलुंड येथील  फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून उपचार सुरू आहे. या काळात बाळाला मदत करावी अशी याचना अन्सारी कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. अन्सारी कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत बेताची अशी होती. या बाळाच्या वडिलाने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ हा मन हेलावून टाकणार होता. ‘मी 10 ते 12 हजार रुपये कमवणारा माणूस आहे, आठ दिवस झाले अजून बाळाची प्रकृती नाजूक आहे. माझ्याकडे पैसे नाही, मी काही करू शकतं नाही’, असं म्हणून अन्सारी यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती **हेही वाचा-** सर्दी-खोकल्याच्या आधी कोरोनाची ही लक्षण येतात समोर, नव्या अभ्यासात दावा ही बाब स्थानिक शिवसैनिक हुसैन शाह यांच्या लक्षात आली. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीबद्दलची माहिती शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आली. बाळाची माहिती मिळताच आदित्य ठाकरे यांनी तातडीने मदतीसाठी पाऊल उचलले. आदित्य यांनी अन्सारी कुटुंबाला तातडीने 1 लाखांची मदत पुरवली आणि बाळाच्या उपचाराचा पुढील खर्च ही उचलणार असल्याचं जाहीर केलं. आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शुक्रवारीच त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, होर्डिंग आणि बनर्सवर खर्च न करता गरजू लोकांना मदत करा असं आवाहन केलं होतं.  आदित्य ठाकरे यांनी ऐन वेळी  केलेल्या मदतीमुळे अन्सारी कुटुंबाने आभार मानले आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात