जाहिरात
मराठी बातम्या / देश / पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

पूजेसाठी आलेल्या गुरुजींनी आशीर्वादासोबत कोरोनाही दिला, नवरदेवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

नवविवाहित दाम्पत्याला एक छोटी चूक खूप महागात पडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 13 जून : देशभरात कोरोनाचं थैमान सुरूच असताना ऑकडाऊनच्या नियमाचं पालन करून विवाह करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याला एक छोटी चूक खूप महागात पडली आहे. लग्नानंतर घरात कथा वाचन आणि पूजा ठेवणं नवविवाहितांना भोवलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली. गोविंदपुरा परिसरात नुकताच लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून विवाह सोहळा पार पडला. त्यानंतप परंपरेनुसार नवरदेवाच्या घरी कथा वाचन आणि पूजा होती. या पूजेला आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांचा संसर्ग नवरदेव आणि त्याच्या भावाला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे वाचा- 80 वर्षांच्या नराधमाचे संतापजनक कृत्य, दोन अल्पवयीन बहिणीवर केले अत्याचार लॉकडाऊनमध्ये सर्व गाइलाइनचं पालन करत विवाहसोहळा संपन्न झाला त्यानंतर घरी पूजा, कथा वाचन आणि आरती झाली. नवविवाहित दाम्पत्यानं गुरुजींचे आशीर्वाद घेतले आणि या आशीर्वादासोबतच कोरोनाही दिला. दुसऱ्यादिवशी घरी आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती या नवरदेवाच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर पूजेसाठी उपस्थित असणाऱ्या 12 लोकांची चाचणी कऱण्यात आली. त्यामध्ये नवरदेव आणि त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं तर वधूला तिच्या माहेरी पाठवण्याची व्यवस्था कुटुंबीयांनी केली. भोपाळमध्ये 24 तासांत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हे वाचा- तलवारी आणि कोयत्यासह घरांवर हल्ला; लहान मुलगा जखमी, परिसरात भीतीचं वातावरण हे वाचा- गर्दीत कसा ओळखणार कोरोनाबाधित? सेनेच्या नगरसेवकाने सुचवला रामबाण उपाय संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात