Home /News /entertainment /

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना, दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला झाला कोरोना, दिल्ली सरकारकडे केली मदतीची मागणी

दीपिकाची आई कोरोना पॉझिटीव्ह आहे मात्र तिला अद्याप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही. यामुळे तिने दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

  नवी दिल्ली, 13 जून : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातल्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये या व्हायरसचं संक्रमण सर्वाधिक झालेलं पाहायला मिळालं. अशात ‘दिया और बाती हम’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंहच्या आईची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. ज्याची माहिती तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून दिली आहे. दीपिकाची आई कोरोना पॉझिटीव्ह आहे मात्र तिला अद्याप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही. यामुळे अभिनेत्री दीपिका सिंहने दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणाली, सर माझी आई 59 वर्षांची आहे. ती आणि माझे बाबा दिल्लीमध्ये आहेत. तिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये तिची 4-5 दिवसांपूर्वी टेस्ट करण्यात आली मात्र तिची रिपोर्ट आमच्या हातात देण्यात आलेला नाही. बाबांना फक्त रिपोर्टचा फोटो काढून घेऊन जाण्यास सांगितलं. आमच्या हातात रिपोर्ट नसल्यानं आम्ही तिला दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखवू शकत नाही आहोत. माझी आई जॉइंट फॅमिलीमध्ये राहते. आमचं कुटुंब पहाड गंजमध्ये आहे. जिथे 45 सदस्य एकत्र राहतात. माझ्या आजीला श्वसनाचा त्रास होत आहे आणि बाबा सुद्धा सस्पेक्टिड आहेत. घरात कोरोनाची एंट्री, जान्हवी कपूर झाली अलर्ट; काय काय काळजी घेते पाहा
  या व्हिडीओमध्ये दीपिकानं दिल्ली सरकारकडे मदत मागितली आहे. ती म्हणाली, मला समजत नाही की, आईला या व्हायरसचं संक्रमण कसं झालं. कारण ती घरातून बाहेर पडत नाही. सर्वजण सांगत आहेत की, घरी राहा आणि काळजी घ्या पण आम्ही घरी राहून तिचा चेस्ट एक्स रे कसा करायचा. कोणकडूनच कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही आहे. मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलले, सर्वांनी एकच सांगितलं की, बेड फुल आहेत. घरात सर्वजण घाबरलेले आहेत. त्यामुळे आता तुमच्या मदतीची खूप गरज आहे. रातोरात स्टार झालेल्या राणू मंडलवर आली अशी वेळ, 2 वेळेचं अन्न मिळणंही अवघड
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Coronavirus

  पुढील बातम्या