JOIN US
मराठी बातम्या / देश / पाण्यात उतरतो तो बाहेर येतच नाही! पवित्र गंगेचा 'शापित घाट', अशी ही आख्यायिका

पाण्यात उतरतो तो बाहेर येतच नाही! पवित्र गंगेचा 'शापित घाट', अशी ही आख्यायिका

बुडून मृत्यू होण्याच्या या घटना काही नवीन नाही आहेत. खरंतर दरवर्षी उन्हाळ्यात याठिकाणी अशा घटना वारंवार घडतात. म्हणूनच या घाटावर पूर्णवेळ पोलीस तैनात करा, अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार होत आहे.

जाहिरात

या घाटाला 'मृत्यू घाट' असं म्हटलं जाऊ लागलं आहे. तर अनेकजण 'शापित घाट' असंदेखील म्हणतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी, 23 जून : गंगेत स्नान केल्यावर सर्व पाप धुवून निघतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे गंगा स्नानासाठी वाराणसीच्या काशीला दूर-दूरहून भाविक येत असतात. मात्र सध्या गंगेच्या घाटांवर एक भयाण शांतता पाहायला मिळते. येथे विचित्र अशा घटना कानावर येतात. वाराणसीच्या अस्सी घाटाजवळ असलेल्या तुळशीघाटात मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, असं म्हटलं जातं. एप्रिल, मे, जून या कालावधीत वाराणसीमध्ये तब्बल 30 जणांनी आपला जीव गमावला, त्यापैकी एकट्या तुळशीघाटावर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता या घाटाला ‘मृत्यू घाट’ असं म्हटलं जाऊ लागलं आहे. तर अनेकजण ‘शापित घाट’ असंदेखील म्हणतात. दोन दिवसांपूर्वीच या घाटात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. याआधी मे आणि एप्रिलमध्येही अशा अनेक घटना घडल्या होत्या.

महत्त्वाचं म्हणजे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तुळशीघाटात बुडून मृत्यू होण्याच्या या घटना काही नवीन नाही आहेत. खरंतर दरवर्षी उन्हाळ्यात याठिकाणी अशा घटना वारंवार घडतात. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. म्हणूनच या घाटावर पूर्णवेळ पोलीस तैनात करा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र तसं होताना दिसत नाहीये आणि दुसरीकडे बुडून मृत्यूच्या घटना वाढतच आहेत. पूर्वी याठिकाणी एक फलक लावून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता गंगा घाटावर केवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. परंतु पर्यटकांवर पूर्ण वेळ लक्ष दिलं जात नाही, असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. 20 वर्षांनंतर तयार होतोय महाकेदार योग, या 3 राशींसाठी ठरेल लाभदायक, सुखाचा होईल वर्षाव तर दुसरीकडे, काशीचे पोलीस उपायुक्त आर. एस. गौतम यांनी सांगितलं की, तुळशी घाटावर घडत असलेल्या या घटनांनंतर त्याठिकाणी धोका दर्शवणारा एक फलक लावण्यात आला आहे. त्याचबरोबर गंगेत बॅरिकेड्सदेखील लावण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनांना नक्कीच आळा बसेल. शिवाय पोलिसांचं पथकदेखील याठिकाणी उपस्थित असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या