याठिकाणी दोन धार्मिक स्थळं एकत्र पाहायला मिळतात.
सोनिया मिश्रा, प्रतिनिधी चमोली, 26 जुलै : आपला भारत विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी संपन्न आहे. उत्तराखंड राज्यातदेखील अशी अनेक धार्मिक स्थळं आहेत, ज्यांना प्राचीन असा इतिहास आहे. आपल्याला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र याठिकाणी दोन धार्मिक स्थळं एकत्रदेखील पाहायला मिळतात. चमोलीमध्ये शिखांचं पवित्र तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिब गुरुद्वार आहे. या गुरुद्वाराजवळच लक्ष्मण लोकपाल मंदिराच्या रूपात हिंदूंचं श्रद्धास्थानदेखील आहे.
समुद्रतळापासून 15225 फूट उंचीवर असलेलं हे जगातील सर्वात उंच लक्ष्मण मंदिर आहे. हेमकुंड तलावाकाठी वसलेल्या या मंदिरात देश-विदेशातील भाविक भगवान लक्ष्मणाच्या दर्शनाला येतात. शिवाय रावणाचा पुत्र मेघनाद याचा वध केल्यानंतर आपली शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी भगवान लक्ष्मणाने ज्याठिकाणी तपश्चर्या केली होती, ते हेच ठिकाण आहे. प्रेमाखातर केले सात समुद्र पार! सीमाचीच नाही ‘यांची’ही लव्हस्टोरी आहे एकदम खास भ्यूंडार गावातील रहिवासी सांगतात की, पूर्वी केवळ रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे उघडले जायचे. तर, अष्टमीला मंदिर बंद व्हायचं. विशेष म्हणजे हेमकुंड साहिब गुरुद्वार उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळीच मंदिराचे दरवाजेही उघडले आणि बंद केले जायचे.