JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांवर मोबाईल बंदी, 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांवर मोबाईल बंदी, 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय

या राज्यातील कोव्हिड-19 रुग्णालयांमध्ये रूग्णांवर मोबाईल वापरास बंदी घातली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 24 मे : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं सर्व राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले जात आहे. अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. यूपीचे डीजी मेडिकल केके गुप्ता यांनी रुग्णांवर मोबाईल बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे महासंचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण) यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोव्हिड-19 (covid-19) रुग्णालयांमध्ये रूग्णांवर मोबाईल वापरास बंदी घातली आहे. डीजीच्या म्हणण्यानुसार मोबाईलमुळे कोरोनाचा संसर्ग पसरतो. यानंतर कोरोना वॉर्डमधील नवीन व्यवस्थेअंतर्गत रूग्णालयाच्या प्रभारींकडे 2 मोबाइल फोन असतील. ज्याद्वारे रुग्ण आपल्या कुटूंबियांशी बोलू शकतील. या आदेशांमध्ये असे स्पष्ट केले आहे की, एल-2 आणि एल-3 रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना आयसोलेशन वॉर्डामध्ये मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी नाही, कारण यामुळे संसर्ग पसरतो. वाचा- या मेडिकल दुकानाचा फोटो का होतोय VIRAL? कारण वाचल्यास वाटेल कौतुक

संबंधित बातम्या

वाचा- आपला जीव धोक्यात टाकून ‘या’ देशात रुग्णांवर उपचार करत आहेत 65 हजार भारतीय डॉक्टर यासह असेही आदेश देण्यात आले आहेत की रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना आपल्या कुटुंबाशी बोलण्यासाठी दोन मोबाईल असतील, यांचा ते वापर करू शकतात. या फोनमध्ये इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोल असणार आहे. दुसरीकडे इतर राज्यातील मजूर घरी परतल्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासांत 288हून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह येथील एकूण संख्या 6 हजार 017 झाली आहे. वाचा- कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांना थायरॉइडचा धोका, रिसर्चमधून नवा दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या